सामूहिक बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; पीडितेने मित्रालाही सांगितला नाही प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 20:39 IST2021-09-07T20:38:03+5:302021-09-07T20:39:55+5:30

मदतीच्या बहाण्याने रिक्षाचालकांसह एकूण १३ जणांनी १४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला.

In front of shocking information in a gang rape case ; The victim no told the friend gang rape incident | सामूहिक बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; पीडितेने मित्रालाही सांगितला नाही प्रकार

सामूहिक बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; पीडितेने मित्रालाही सांगितला नाही प्रकार

पुणे : मदतीच्या बहाण्याने रिक्षाचालकांसह एकूण १३ जणांनी १४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याच्या प्रकरणात आता अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. या मुलीवर सतत दोन दिवस अत्याचार झाल्यानंतरही तिने ही बाब मुंबई ते चंदीगड दरम्यानच्या रेल्वे प्रवासात तिच्याबरोबर असलेल्या मित्रालाही आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी या १३ नराधमांनी तिच्यावर पाशवी अत्याचार करताना अनैसर्गिक संभोगही केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिला पैसे देऊन मुंबईला पाठविले. २ सप्टेंबरला दादरला तिने आपला मोबाईल बंद केला. पोलीस तातडीने मुंबईला गेले. परंतु, तोपर्यंत ती तेथून निघून गेली होती. तिने मित्राला दादरला बोलावून घेतले व ते रेल्वेने चंदीगडकडे गेले.

दरम्यान, पोलिसांनी तिने ज्यांना कॉल केले. त्यांचा पाठपुरावा पोलिसांनी सुरु केला. त्यात तिच्या मित्राचा नंबर पोलिसांना मिळाला. पोलिसांनी त्या मोबाईलचे विश्लेषण केल्यावर त्यांना ते रेल्वेने प्रवास करीत असल्याचे दिसून आले. दिल्लीच्या पुढे रेल्वे गेल्या लक्षात आल्यावर पुणे पोलिसांनी चंदीगड पोलिसांना याची तातडीने त्या दोघांची माहिती दिली. चंदीगड पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्याबरोबर पुणे पोलीस विमानाने चंदीगडला गेले व त्यांनी दोघांना घेऊन पुण्यात आले. घाबरलेल्या या मुलीला पोलिसांनी धीर देऊन तिच्याकडून सर्व माहिती घेतल्यावर हा सर्व प्रकार उघड झाला.

रेल्वे प्रवासादरम्यान या मुलीला त्रास होत होता. तेव्हा तिच्या मित्राने तिला विचारल्यावर तिने पोटात दुखतयं असे सांगितले. पण कशामुळे हे काहीही सांगितले नव्हते. मित्राने तिला फूस लावल्याने ती घराबाहेर पडली. त्यातूनच हा सर्व प्रकार घडल्याने मित्रालाही पोलिसांनी आरोपी करुन अटक केली आहे.

Web Title: In front of shocking information in a gang rape case ; The victim no told the friend gang rape incident