शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

सहकारमंत्र्यांच्या घरावर मोर्चा

By admin | Updated: June 4, 2015 22:55 IST

दोन हजार कोटी रूपये ऊस उत्पादकांना तातडीने देऊ असे सांगून सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे.

मंचर : दोन हजार कोटी रूपये ऊस उत्पादकांना तातडीने देऊ असे सांगून सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. सहकार मंत्र्यांना वठणीवर आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोल्हापूर येथील चंद्रकांत पाटील यांच्या घरावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा बुधवार दि.१० जून रोजी काढला जाणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी बुधवारी रात्री केली.आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव-खडकी येथे राज्यव्यापी दुध आणि ऊस परिषद संपन्न झाली. त्यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन आणि आंदोलनाची दिशा स्पष्ट करताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील बोलत होते. यावेळी शिवाजीराव नांदखिले, प्रभाकर बांगर, पांडूरंग रायते, वनाजी बांगर, तानाजी बेनके, बाळासाहेब पठारे, कालीदास आपटे, आनंद शिंदे, लक्ष्मण शिंदे आणि राज्याच्या विविध भागातून आलेले ऊस उत्पादक आणि दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.ऊसाचा एफ.आर.पी.भाव १४ दिवसांत आणि एकरकमी देणे कारखाने आणि सरकारला बंधनकारक आहे, असे कायदा सांगतो जर सरकारच कायदे पाळत नसेल तर शेतकऱ्यांनी का कायदा पाळावा असा सवाल करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकरी संपविण्यासाठी पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे देशाची वाटचाल अराजकतेच्या दिशेने चालू झाली आहे असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला़ दुधाच्या दराबाबत बोलताना रघुनाथ दादा पाटील म्हणाले, दुध पावडर निर्यातीवर बंदी आणल्यामुळे दुध व्यवसायाला घरघर लागली आहे. या सरकारच्या अगोदर असणाऱ्या सरकारने दुधाच्या पावडरला अनुदान देत होते. परंतु विद्यमान सरकारने दुधाच्या पावडरवरील अनुदान बंद करून दुध उत्पादकाची चेष्टा सुरू केली आहे. यावेळी शिवाजीराव नांदखिले,पांडूरंग रायते,वनाजी बांगर,आनंद शिंदे,लक्ष्मण शिंदे,बाळासाहेब पठारे,कालीदास आपेट यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रभाकर बांगर यांनी केले. (वार्ताहर)सहकार मंत्री चंदक्रांत पाटील यांनी सरकारच्या वतीने २ हजार कोटी रूपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची घोषणा २ महिन्यापूर्वी केली. परंतु अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह सर्वांचेच अर्थकारण कोलमडले आहे. जून महिना सुरू झाला आहे. शेतीच्या पेरणी,मशागतीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. आडसाली ऊस लागवड करण्याची वेळ आली आहे. शाळेचे दिवस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या वह्या पुस्तकांसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. अशा परिस्थितीत शेतकरी असताना सरकारला मात्र शेतकऱ्यांबाबत आस्था नाही़- रघुनाथदादा पाटीलराज्य अध्यक्ष शेतकरी संघटना