जीबीएसच्या सर्व रुग्णांवर मोफत उपचार करा; काँग्रेस शिष्टमंडळाची महापालिका आयुक्तांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 09:43 IST2025-01-25T09:42:20+5:302025-01-25T09:43:36+5:30

जलप्रदूषण रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, दूषित पाण्याचा मूळस्त्रोत ओळखण्यासाठी त्वरित जल तपासणी मोहीम हाती घ्यावी

Free treatment for all GBS patients Congress delegation demands from Municipal Commissioner | जीबीएसच्या सर्व रुग्णांवर मोफत उपचार करा; काँग्रेस शिष्टमंडळाची महापालिका आयुक्तांकडे मागणी

जीबीएसच्या सर्व रुग्णांवर मोफत उपचार करा; काँग्रेस शिष्टमंडळाची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे: शहरात दूषित पाण्यामुळे जीबीएस आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून, या रुग्णांवर महापालिकेच्या वतीने मोफत उपचार करावेत. तसेच जलप्रदूषण रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या शिष्टमंडळात प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, ओबीसी विभागाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत सुरसे, शेखर कपोते, चेतन अग्रवाल, अनिकेत सोनवणे यांचा समावेश होता. शहराच्या विविध भागांत विशेषतः सिंहगड रोड आणि परिसरातील ग्रामीण भागांमध्ये दूषित पाण्यामुळे जीबीएस या गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. राज्य आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत ६७ रुग्णांची नोंद करण्यात आली असून, त्यातील १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या सर्व रुग्णावर महापालिकेने मोफत उपचार करावेत.

तसेच औषधोपचाराची तातडीने व्यवस्था करावी. तसेच दूषित पाण्याचा मूळस्त्रोत ओळखण्यासाठी त्वरित जल तपासणी मोहीम हाती घ्यावी. शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या स्थितीत त्वरित आणि प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, जलप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत आवश्यक पावले उचलावीत, नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकर सेवा उपलब्ध करून द्यावी, दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी या मागण्या निवेदनाद्वारे केल्या.

Web Title: Free treatment for all GBS patients Congress delegation demands from Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.