शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

नियम पाळणाऱ्या पुणेकरांना फुकट चहा ; येवले चहा आणि पुणे वाहतूक शाखेचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 11:41 AM

जागतिक चहा दिनानिमित्त पुण्यातील येवले चहा आणि वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना मोफत चहाचे वाटप करण्यात आले.

पुणे : जागतिक चहा दिनानिमित्त पुण्यातील येवले चहा आणि वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना मोफत चहाचे वाटप करण्यात आले. पुण्यातील विविध चौकात हा उपक्रम राबवण्यात आला. झाशीची राणी चौकातही हा उपक्रम राबविण्यात आला, यावेळी वाहतूक उपयुक्त तेजस्वी सातपुते, येवले चहाचे नवनाथ येवले पाेलीस कर्मचारी आदी  उपस्तिथ होते.        काही माहिन्यांपूर्वी एका सनदी अधिकाऱ्यापेक्षा जास्त कमाई करणारा येवले चहा असल्याच्या बातम्या सर्वत्र आल्या होत्या. जागतिक चहा दिनाच्या निमित्ताने येवले यांना माेफत चहा पाेलीस कर्मचाऱ्यांना द्यायचा हाेता. परंतु पाेलीस कर्मचाऱ्यांऐवजी वाहतूकीचे नियम पाळणाऱ्यांना माेफत चहा देण्यात यावा अशी कल्पना वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी मांडली. त्यानुसार वाहतूकीचे नियम पाळणाऱ्या 10 हजार नागरिकांना चहाचे कुपन देण्यात येणार आहे. हे कुपन येवले चहाच्या दुकानात दाखविण्यानंतर माेफत चहा पिता येणार आहे. या उपक्रमात वाहतूक शाखा सुद्धा सहभागी झाली. आज सकाळी झाशीची राणी चाैकात सातपुते यांनी स्वतः पाेलीस कर्मचाऱ्यांसाेबत वाहतूकीचे सर्व नियम पाळणाऱ्या नागरिकांना चहाच्या कुपनचे वाटप केले. तसेच ज्यांनी नियम पाळले नाहीत त्यांना नियम पाळण्याचे आवाहन केले.

    सातपुते म्हणाल्या, जागतिक चहा दिनानिमित्त येवले यांना पाेलिसांना माेफत चहा द्यायचा हाेता. त्यावेळी जे नागरिक वाहतूकीचे नियम पाळतात त्यांना चहा देण्यात यावा अशी कल्पना मी मांडली. त्यानुसार पुण्यातील विविध चाैकांमध्ये आज चहाचे कुपन वाटण्यात येणार आहे. यातून नागरिकांमध्ये नियम पाळण्याबाबत चांगला संदेश जाणार आहे. तसेच पाेलीस हे नेहमी चलान फाडतात अशी नागरिकांमध्ये समज असते. परंतु पाेलीस चांगल्या गाेष्टींना देखिल प्राेत्साहन देतात हा संदेश यातून नागरिकांमध्ये जाणार आहे.          वाहतूकीचे नियम पाळणाऱ्या 10 हजार पुणेकरांना चहाच्या कुपनचे वाटप करण्यात येणार आहे. हे कूपन येवले चहाच्या कुठल्याही दुकानात येत्या 17 डिसेंबरपर्यंत दाखवून चहा पिता येणार आहे.

टॅग्स :PoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी