Free lunch box for the needy with corona positive; great project in Pune | क्या बात है! कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गरजूंना माेफत जेवणाचा डब्बा : पुण्यातला स्तुत्य उपक्रम

क्या बात है! कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गरजूंना माेफत जेवणाचा डब्बा : पुण्यातला स्तुत्य उपक्रम

ठळक मुद्देमुकुंद भवन ट्रस्ट, माहेश्वर समाज श्रीराम मंदिराचा उपक्रम

पुणे : कोरोनाची रूग्णसंख्या पुण्यात अधिक होत असताना अनेक रूग्णांना, नागरिकांना जेवणाचा डब्बा मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे यावर श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि श्री माहेश्वरी समाज श्रीराम मंदिर ट्रस्टने आता मोफत सायंकाळचा डब्बा देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आदल्या दिवशी ट्रस्टच्या हेल्पलाइनवर नोंदणी करायची आणि दुसऱ्या दिवशी मोफत डब्बा मिळवायचा, असा हा उपक्रम आहे.

पुण्यासारख्या महानगरात छोटी किंवा केवळ पति-पत्नी अश्या कुटुंबांची संख्या लक्षणीय आहे. अशात पति-पत्नी दोघे किंवा संपूर्ण कुटुंब करोनाबाधित झाल्यास त्यांची एकच तारांबळ उडते. त्यात जेवण खाण्याची व्यवस्था नसेल, तर ते पार कोलमडून जातात. अश्या वेळी करोनाच्या आजारपणात पौष्टिक आहार उपलब्ध व्हावा म्हणून रुग्णांसाठी जेवणाचे डबे ‘विनामूल्य‘ देण्यासाठी श्रीमुकुंद भवन ट्रस्ट व श्री माहेश्वरी समाज श्रीराममंदिर ट्रस्टने पुढ़ाकार घेतला आहे. जेवणाचे हे डबे रुग्णांसाठी संध्याकाळसाठी उपलब्ध राहतील.

मागील लॉकडाऊनमध्येही ट्रस्टच्यावतीने अंदाजे दीड लाख आहाराची व तीन लाख खिचडीची पाकिटं उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी भोजन सेवा सुरू केली आहे, या उपक्रमाचे नियोजन पुरुषोत्तम लोहिया, शरद सारडा, सत्येंद्र राठी, चंदन मुंदडा, घन:श्याम लढ्ढा करत आहेत.
—————————
डब्बा कसा मिळेल -
सध्याच्या लॉकडाऊनमध्ये स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज पोळी चपातीची पाचशे पाकिटं दिली जात आहेत. या उपक्रमात ज्या रुग्णांना डबे हवे आहेत, त्यांनी कृपया 94226 55326 या व्हाटस्ॲप नंबरवर आपली माहिती पाठवावी. ( कॉल करू नयें ) त्यामध्ये नाव, पत्ता, कोविड पॉझिटिव्ह प्रमाणापत्राचा नंबर, डबा नेण्याची व्यवस्था काय आणि मोबाईल नंबर पाठवावा.  किंवा  खालील लिंक वर नोंद करावी. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfEy3NqWhB0Fgrjqz7n6FLXLHaaFLZmLCntuzPG6zDHH1QMuA/viewform
 

टिफ़िन मिळण्याची वेळ-: संध्या ६ ते ७ असेल.
आपली डब्याची मागणी आदल्या दिवशी सायंकाळी ६ पर्यंत कळवावी.

डबा मिळण्याची जागा-: सावरकर स्मारक, डेक्कन कॉर्नर, गरवारे प्रशाले समोर, कर्वे रोड, पुणे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Free lunch box for the needy with corona positive; great project in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.