शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

शहरातील मॉलमध्ये मोफत पाणी पुरवठा करा, शहर सुधारणा समितीत प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 9:24 PM

शहरातील बहुतांशी मॉलमध्ये नागरिकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे येथील छोटे-मोठे हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेते जादा दराने पाण्याची विक्री करतात.

ठळक मुद्देमॉलमध्ये आर्थिक लूट होत असल्याने मोफत पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव

पुणे : शहरातील विविध मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. यामुळे मॉलमध्ये खरेदीसाठी जाणा-या नागरिकांना मोफत पिण्याचे पाणी पुरविण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या शहर सुधारणा समितीपुढे मांडण्यात आला आहे. या प्रस्तावर येणा-या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. शहरातील बहुतांशी मॉलमध्ये नागरिकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे येथील छोटे-मोठे हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेते जादा दराने पाण्याची विक्री करतात. सध्या शहरातील मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये एक लिटर पाण्याच्या बाटलीसाठी ३० ते ४५ रुपये मोजावे लागतात. हे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत. परंतु पाण्यासाठी नागरिकांना जास्तीचे दर द्यावेच लागतात. त्यामुळे मॉलमध्ये नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याने त्यांना मोफत पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव राणी भोसले यांनी मांडला आहे. परंतु, त्यावर पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी सांगितले. त्यानुसार शहरातील मॉलची संख्या, तेथील पाण्याची व्यवस्था, त्याच्या विक्रीचा दर याबाबतची माहिती प्रशासन गोळा करण्यात येणार असून त्यानंतर प्रस्तावावर कार्यवाही होणार आहे.  

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी