शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

पुणे- मुंबई महामार्गावर टोलमध्ये कोट्यवधीचा गफला : आपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 07:00 IST

वारंवार मुदतवाढ देऊन या मार्गावरील टोलमधून गेल्या दोन वर्षात तब्बल २ हजार ५०० कोटी रूपयांची वसुली बेकायदा केली जात असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

ठळक मुद्दे२ हजार ५०० कोटी रुपये जादा उकळले

पुणे: प्रशासकीय व देखभाल दुरूस्ती खर्च वजा जाता मुळ भांडवल, त्यावरचे व्याज असा दामदुप्पट परतावा मिळाल्यानंतरही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरची टोल वसुली सरकारने सुरूच ठेवली आहे. वारंवार मुदतवाढ देऊन या मार्गावरील टोलमधून गेल्या दोन वर्षात तब्बल २ हजार ५०० कोटी रूपयांची वसुली बेकायदा केली जात असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पाटीर्ने(आप) केला आहे. टोल मुक्त महाराष्ट्राची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आप ने केली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने १५ वर्षांपूर्वी टोल ची पद्धल सुरू केली.

खासगी व्यावसायिकांनी रस्ते बांधणीसाठी त्यांची गुंतवणूक करायची, देखभाल दुरूस्तीही करायची व त्या बदल्यात त्यांनी गुंतवलेल्या रकमेचा व्याजासह परवतावा होत नाही तोपर्यंत त्या रस्त्यावर दर ४० किलोमीटर अंतरावर टोल लावायचा असा करार त्यावेळी केला. व्यावसायिकाला त्याच्या रकमेचा परतावा देताना त्याने गुंतवलेली रक्कम, त्यावरचे व्याज, त्याला मिळणारा फायदा तसेच त्या मार्गावरची २४ तासांतील वाहन संख्या वगैरेचा बारकाईने विचार करून टोलची किंमत निश्चित केली होती.पुणे-मुंबई द्रुतगती मागार्साठी ९१८ कोटी रूपयांची  बोली लावणाऱ्या एका कंत्राटदाराची निविदा मान्य झाली. त्यांना ते करणार असलेल्या गुंतवणुकीच्या बदल्यात द्रुतगती मार्ग व  जुन्या महामार्गावर टोल वसुलीचे हक्क दिले. करारात नमुद केल्याप्रमाणे वसुलीचे एकूण उद्दीष्ट ४३३० कोटी (२८६९ कोटी एक्स्प्रेस वे वर अधिक १४६१ कोटी जुन्या रस्त्यावर) निश्चित करण्यात आले. हे उद्दीष्ट पुर्ण झाल्यानंतरही कंत्राटदाराने जानेवारी २०१७ अखेर ४५०७ कोटी टोल वसूल केला होता. मूळ भांडवलावरचा परतावा, कार्यालयीन खर्च, दुरुस्ती, देखभाल, सुविधा खर्च या सर्व बाबीशिवाय पुढील दोन वर्षांची देखभाल, हा सर्व खर्च या टोल वसुलीच्या उद्दिष्ट असलेल्या ४३३० कोटीत गृहीत धरलेला आहे. जास्तीची वसुली झालेली असतानाही हा टोल सरकारने कंत्राटदाराच्या मागणीवरून एप्रिल २०१७ पासून वाढवला. कागदपत्रानुसार फेब्रुवारी २०१९ अखेरची जमा ६३६९ कोटी, म्हणजे उद्दिष्टापेक्षा अंदाजे २००० कोटीने अधिक आहे. आता ऑगस्ट २०१९ मध्ये हा वाढीव करार संपत असूनही सरकार पुढे टोल वसुली सुरूच ठेवणार असल्याचे दिसते आहे. कंत्राटदार व अधिकारी यांचे यात संगनमत असल्याचे स्पष्ट दिसत असून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. यात प्रवासी नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असूनही त्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत आहे.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गtollplazaटोलनाकाfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस