शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने १८ लाखांची फसवणूक;आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:33 IST2025-06-20T15:29:36+5:302025-06-20T15:33:42+5:30

गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. तरुण आणि त्याच्या वडिलांनी या आमिषाला बळी पडून सायबर चोरट्याने दिलेल्या बँक खात्यावर पैसे पाठवून दिले.

Fraud of Rs 18 lakhs on the pretext of share trading | शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने १८ लाखांची फसवणूक;आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने १८ लाखांची फसवणूक;आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने एका व्यक्तीला सायबर चोरट्यांनी १८ लाख ४६ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी आंबेगाव बुद्रुक येथील ३१ वर्षीय तरुणाने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी तरुण आणि त्याच्या वडिलांना सायबर चोरट्याने मेसेज करून शेअर ट्रेडिंगची माहिती दिली. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. तरुण आणि त्याच्या वडिलांनी या आमिषाला बळी पडून सायबर चोरट्याने दिलेल्या बँक खात्यावर पैसे पाठवून दिले. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.

पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक झिने करत आहेत. तसेच क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल असे सांगून उंड्री येथील एका २१ वर्षीय तरुणाची २ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक काळंगे करत आहेत.

Web Title: Fraud of Rs 18 lakhs on the pretext of share trading