चांगला मोबदला देतो सांगून वृद्धाची दीड लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Updated: October 18, 2023 14:41 IST2023-10-18T14:41:04+5:302023-10-18T14:41:19+5:30
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

चांगला मोबदला देतो सांगून वृद्धाची दीड लाखांची फसवणूक
पुणे : अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीने याबाबत मंगळवारी (दि. १७) पोलिसांना तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ११ डिसेंबर २०२२ रोजी घडला आहे. याप्रकरणी अनिल कृष्णराव जाधव (वय-६०, रा. बिबवेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांना फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, तक्रारदार यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. भारत पेट्रोलियम नावाच्या अप्लिकेशनवरून पैश्यांची गुंतवणूक केल्यास चांगला मोबदला मिळेल असे सांगितले. तक्रारदार यांचा विश्वास संपादन करून सांगितलेले अप्लिकेशन डाउनलोड करण्यास भाग पडले. त्यानंतर परतावा देण्याचे आमिष दाखवून तक्रारदार यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये उकळले. पैसे गुंतवल्याचा कोणताही परतावा मिळाला नाही म्हणून विचारणा केली असता कोणताही परतावा न मिळाल्याने विचारणा केली असता प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिघावकर हे करत आहेत.