भाडेतत्वावर घर उपलब्ध असल्याचे सांगून महिलेची सव्वा लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Updated: September 4, 2023 17:58 IST2023-09-04T17:57:38+5:302023-09-04T17:58:12+5:30
बुकिंग करण्यासाठी वेगवगेळे चार्जेस भरावे लागतील तसेच व्हिजिटर पास काढावा लागेल असे सांगून महिलेकडून एकूण १ लाख २६ हजार रुपये उकळले

भाडेतत्वावर घर उपलब्ध असल्याचे सांगून महिलेची सव्वा लाखांची फसवणूक
पुणे: सोशल मीडियावर भाडेतत्वावर घर उपलब्ध असल्याचे सांगून त्यासाठी वेगवेगळे चार्जेस भरावे लागतील असे सांगत महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
हा प्रकार २९ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळच्या सुमारास घडला. याबाबत खराडी परिसरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेने चंदननगर पोलिसांना फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सोशल मीडियावर भाडेतत्वावर घर शोधत होत्या. त्यावेळी त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला आणि घर उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. त्याची बुकिंग करण्यासाठी वेगवगेळे चार्जेस भरावे लागतील तसेच व्हिजिटर पास काढावा लागेल असे सांगून महिलेकडून एकूण १ लाख २६ हजार रुपये उकळले. हे पैसे महिलेने ७ टप्प्यांत भरले. त्यानंतर महिलेला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सून महिला पोलीस निरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.