Pune Crime: इंस्टाग्रामवर मेसेज करून पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवत तरुणीची ८ लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Updated: June 16, 2023 16:03 IST2023-06-16T16:01:04+5:302023-06-16T16:03:40+5:30
अधिक मोबदला देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ८ लाख ६२ हजार ९८९ रुपये जमा करण्यास सांगितले...

Pune Crime: इंस्टाग्रामवर मेसेज करून पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवत तरुणीची ८ लाखांची फसवणूक
पुणे : कमी प्रमाणात गुंतवणूक केलेल्या पैशांचा मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक केल्याची घटना येरवडा परिसरात घडली आहे. येरवडा परिसरात वास्तव्यास असणाऱ्या २७ वर्षीय तरुणीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, तरुणीने मयुरी मांजरेकर या इंस्टाग्राम पेजवर ६ हजार रुपये गुंतवल्यास ८० हजार रुपये परतावा देण्याच्या आशयाची जाहिरात पहिली होती. त्यांनतर तरुणीने इंस्टाग्रामवर मेसेजद्वारे संपर्क करून पैसे गुंतवण्यास सहमती दर्शवली असता मयुरी मांजरेकर नावाच्या इंस्टाग्राम युजरने अधिक मोबदला देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ८ लाख ६२ हजार ९८९ रुपये जमा करण्यास सांगितले.
सांगितल्याप्रमाणे पैसे जमा करूनदेखील कोणताही परतावा मिळाला नाही म्हणून संपर्क केला असता प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यांनतर तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत मयुरी मांजरेकर नावाच्या प्रोफाइल युजर विरोधात तक्रार नोंदवली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जयदीप गायकवाड हे करत आहेत.