शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
2
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
3
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
4
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
5
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
6
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
7
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
8
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
9
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
10
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
11
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
12
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
13
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
14
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
15
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?
16
Mumbai Crime: सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले
17
जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड
18
निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
19
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
20
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर

कर्ज वितरणात गोंधळ : पगार २१ हजार, हप्ता २३ हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 11:31 IST

संचालकांनाही नियमबाह्य कर्ज वितरण

ठळक मुद्देनिवृत्तीनंतरही काही संचालक पदावर कार्यरत असल्याचे निरीक्षण लेखापरीक्षण अहवालात नोंदसंचालकांच्या बेकायदा कृतीस लेखापरीक्षकांची साथ

विशाल शिर्के - पुणे : दि पुणे पोस्ट्स अ‍ॅण्ड टेलिकॉम को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सभासदांना परतफेडीची क्षमता दिसत २१,७०३ मूळ वेतनावर २३,५०० रुपयांचा हप्ता देऊन तारण कर्ज मंजूर करण्याचा प्रकार उघड झाला आहे. गृह, वाहन आणि तारण कर्जाचे अर्ज देखील पूर्ण भरून देण्याची तसदी घेतली नसून, नो युवर कस्टमरची (केवायसी) कागदपत्रेदेखील उपलब्ध नाहीत. त्याचबरोबर निवृत्त होणाऱ्या संचालकांना दीर्घ मुदतीची कर्ज वितरण करणे आणि निवृत्तीनंतरही काही संचालक पदावर कार्यरत असल्याचे निरीक्षण चाचणी लेखापरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहेत. महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६०च्या कलम ८१(३) (क) अन्वये जिल्हा विशेष लेखापरीक्षक सी. बी. गव्हाणकर यांनी केलेल्या तपासणीत ही बाब समोर आली आहे. संस्थेच्या सेवकांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम व्यवहारात वापरण्यात आल्याचे ताशेरे अहवालात ओढण्यात आले आहेत. गृह कर्ज वितरण करताना घरावर कर्जाचा बोजा न चढविणे, कर्ज अर्जात वेतनाचा तपशील नसणे, केवायसीची कागदपत्रे पूर्ण नसल्याचे आढळून आले आहे. गृह उपयोगी वस्तूंचे कर्ज वितरणदेखील याच पद्धतीत करण्यात आले आहेत. वाहन कर्ज वितरण करताना कोऱ्या मुद्रांक कागदावर सह्या घेणे, आरसी बुकवर कर्ज बोजा न चढविणे अशा गंभीर त्रुटी कर्ज वितरणात आढळल्या आहेत. सिद्धलिंग गणपत कोठावळे यांना मार्च २०१५ रोजी १२ लाख रुपयांचे कर्ज मंजूूर केले. त्यांचा निव्वल पगार २१ हजार ७०३ असून, त्यांना हप्ता २३,५०० रुपये इतका आहे. त्यांच्या तारण मालमत्तेवर कर्जाचा बोजाही टाकलेला नाही. राहुल जगताप यांना संचालक मंडळाने १० लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले असताना १२ लाख रुपये वितरीत करण्यात आल्याचे ताशेरेही अहवालात ओढले आहे. ..........संचालकांच्या बेकायदा कृतीस लेखापरीक्षकांची साथसंस्थेचे तत्कालीन संचालक नागेशकुमार नलावडे, दिलीप जगदाळे, शिवाजी नाईकरे यांनी निवृत्त होण्यापूर्वी दीर्घ मुदतीची कर्जे घेतली. तसेच, निवृत्तीनंतरही ते पदावर कार्यरत होते. ४विशेष म्हणजे, २०१७-१८च्या लेखापरीक्षण अहवालात लेखापरीक्षकांनी संचालकांच्या कर्ज खात्यांची तपासणी करुन ते थकबाकीदार नसल्याचे नमूद केले आहे. नियमानुसार सेवानिवृत्तीपर्यंत पूर्ण कर्ज वसूल होणे अपेक्षित होते. लेखापरीक्षकांनी अहवालात सुस्पष्ट अभिप्राय न नोंदवीत आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे चाचणी अहवालात म्हटले आहे. 

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीMONEYपैसा