कॉलसेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांंना १ हजार ५०० डॉलर्सला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:45 PM2018-04-14T13:45:10+5:302018-04-14T13:45:10+5:30

अमेरिकेसह इतर देशातील नागरिकांना इंटरनॅशनल रेव्हेनीव्ह आॅफिसर बोलत असल्याचे सांगून विविध कर भरण्यासाठी दबाव टाकला. कर न भरल्यास त्यांना कारवाई करण्याची धमकी देखील देवून आरोपींनी १ हजार ५०० डॉलरची फसवणूक केली.

fraud with foreign citizens through call center one thousand 500 dollars | कॉलसेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांंना १ हजार ५०० डॉलर्सला गंडा

कॉलसेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांंना १ हजार ५०० डॉलर्सला गंडा

Next
ठळक मुद्देइंटरनॅशनल रेव्हेनीव्ह आॅफिसर बोलत असल्याचे सांगून त्यांना विविध कर भरण्यासाठी दबाव राजस्थान येथे फेक कॉल सेंटर चालवित असल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न

पुणे : अमेरिकेसह इतर देशातील व्यक्तींची माहिती मिळवून त्यातील काहींना धमकावून १ हजार ५०० डॉलर्सची फसवणूक करणा-यां दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एच. मोहम्मद यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.  हार्दिक पटेल आणि सोहेल मेनन (दोघेही रा. अहमदाबाद, गुजरात) अशी अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेल्यांची नावे आहेत. कॉलसेंटरच्या माध्यमातून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी शिवक प्रितमदा लधानी (वय २९, रा. लोहगाव रोड, धानोरी), प्रतिक सुभाषचंद्र पांचाल (वय ३०) आणि शेरल शतिषभाई ठाकर (वय ३३, दोघेही रा. कोरेगाव पार्क) यांना गुन्ह्यात यापूर्वी अटक करण्यात आली होती. हे तिघेही जामीनावर आहेत. तर कुणाल धर्मानी आणि जतन ओझा (दोघेही रा. अहमदाबाद, गुजरात) या दोघांचा पोलीस शोध घेत आहे. दोघेही गुजरात येथील रहिवासी असून इतर संशयित आरोपींनी संगनमत करून भारतात विविध ठिकाणी कॉलसेंटर स्थापन केले. त्यातून तब्बल ११ हजार १२५ अमेरीकन तसेच इतर देशातील नागरिकांची वैैयक्तिक माहिती प्राप्त करून त्यांना कॉलसेंटरच्या माध्यमातून फोन केले. त्यांना इंटरनॅशनल रेव्हेनीव्ह आॅफिसर बोलत असल्याचे सांगून त्यांना विविध कर भरण्यासाठी दबाव टाकला. कर न भरल्यास त्यांना कारवाई करण्याची धमकी देखील देवून आरोपींनी १ हजार ५०० डॉलरची फसवणूक केली.दोघेही परप्रांतीय असून आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवत आहेत. गुन्ह्यास बळी पडलेले हे परदेशी नागरिक असून त्यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलीन होत आहे. पटेल हा गुन्ह्याचा मास्टरमाईंड असून गुजरात पोलिसांच्या बनावट कॉल सेंटरवर होणा-या कारवायांमुळे तो पुण्यात कॉल सेंटर चालवित होता.पटेल हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने राजस्थान येथे फेक कॉल सेंटर चालवित असल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. याप्रकरणाच्या पुढील तपासासाठी दोघांचा अटक पूर्व जामीन फेटाळण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी केली होती. या युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला. 

Web Title: fraud with foreign citizens through call center one thousand 500 dollars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.