शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

पूजा खेडकरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; प्रशिक्षणादरम्यान अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 05:47 IST

स्वत:ची खोटी ओळख देऊन परीक्षा प्रक्रियेत फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असल्याचे ‘यूपीएससी’ने एका निवेदनात म्हटले आहे.

नवी दिल्ली : बनावट ओळख देऊन नागरी सेवेत रुजू होण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पूजा खेडकर यांच्या विरोधात शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

प्रशिक्षणादरम्यान अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप पूजा यांच्यावर आहे. पूजा यांनी त्यांचे, आई-वडिलांचे नाव, स्वत:चे छायाचित्र, स्वाक्षरी, ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक, पत्ता हे सारे बदलले. स्वत:ची खोटी ओळख देऊन परीक्षा प्रक्रियेत फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असल्याचे ‘यूपीएससी’ने एका निवेदनात म्हटले आहे.

यूपीएससीने कोणती पावले उचलली?

पूजा खेडकर यांच्या विरोधात ‘यूपीएससी’ने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा खटला चालविला जाईल, तसेच नागरी सेवेतील त्यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नागरी सेवा-२०२२च्या नियमांनुसार भविष्यात पूजा  यांच्यावर परीक्षा देण्यासाठी व निवड होण्याबाबत बंदी घालण्यासाठी ही नोटीस जारी करण्यात आली. तसेच पोलिसांनीही नागरी सेवेमध्ये संधी मिळण्यासाठी दिव्यांगांच्या कोट्याचा गैरवापर करणे, फसवणूक, गैरवर्तन या आरोपांखाली गुन्हा नोंदविला आहे.

कायदा आपले काम करेलच. आरोपांबाबत मला जे काही सांगायचे ते मी न्यायालयात सांगेन.

              - पूजा खेडकर

टॅग्स :ias pooja khedkarपूजा खेडकरPuneपुणे