शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

चौघा जणांंविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: June 21, 2016 00:24 IST

उरुळी कांचन येथे १६ जून रोजी सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली होती. त्या विवाहितेच्या जावेने नवरा, सासू, सासरा व नणंद वेळोवेळी शारीरिक

लोणी काळभोर : उरुळी कांचन येथे १६ जून रोजी सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली होती. त्या विवाहितेच्या जावेने नवरा, सासू, सासरा व नणंद वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करत असल्याची तक्रार दिली आहे.या प्रकरणी रमनियता प्रशांत बडेकर (वय ३०, रा. बडेकरनगर, उरुळी कांचन, सध्या मळद, ता. दौंड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती प्रशांत भुजंगराव बडेकर, सासू जनाबाई भुजंगराव बडेकर, सासरे भुजंगराव वामन बडेकर (तिघेही रा. बडेकरनगर, उरुळी कांचन) व नणंद प्रज्ञा देवानंद वाघमारे (रा. हडपसर) या चौघांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रमनियता व प्रशांत यांचा विवाह १६ डिसेंबर २०१२ रोजी झाला. त्यानंतर जानेवारी २०१३ पासून सासरे व सासू तिला व्यवस्थित स्वयंपाक येत नाही, तसेच इतर कारणांवरून तिला टोचून बोलत होते. नवरा प्रशांत यास दारूचे व्यसन असल्याने तो आपली तल्लफ भागवण्यासाठी घरांतील रॉकेल, गहू, तांदूळ, भांडी विकत असे. समजावून सांगितले तर तो मारहाण करत असे. सासू-सासरेही त्याचीच बाजू घेत. तिचा दीर प्रदीप हा त्याची पत्नी आशा ऊर्फ वर्षा हिस तू भिकारी आहेस. आमची बरोबरी करू शकत नाहीस. तू घरांतून निघून जा, असे म्हणून दारू पिवून मारहाण करत असे. तिचाही असाच छळ सुरू होता.९ जून रोजी रमनियता माहेरी निघून गेली. त्यानंतर १४ जून रोजी रात्री आशा ऊर्फ वर्षा हिने सासरचा छळ असह्य झाल्याने रॉकेल अंगावर ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात तिच्यावर उपचार चालू असताना १५ जून रोजी मृत्यू झाला. तिचे आईने आशा हिचा पती, सासू, सासरा, दीर व दोन नणंदा यांच्याविरोधांत फिर्याद दिली. यावरून तिचा पती प्रदीप भुजंगराव बडेकर यास अटक करण्यात आली आहे. ही माहिती रमनियता हिला १७ जून रोजी वर्तमानपत्र वाचल्यानंतर समजली. त्यानंतर तिने १८ जून रोजी आपणांसही पती, सासू-सासरे व नणंद शारीरिक व मानसिक छळ करत असल्याची तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे हे करीत आहेत. (वार्ताहर)