शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या दिवशीही डाएटच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू

By admin | Updated: September 24, 2015 03:11 IST

एफटीआयआय’पाठोपाठ आता ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी’ (डाएट)च्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू आणि कुलसचिवांच्या विरोधातील आंदोलन तीव्र केले आहे.

पुणे : ‘एफटीआयआय’पाठोपाठ आता ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी’ (डाएट)च्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू आणि कुलसचिवांच्या विरोधातील आंदोलन तीव्र केले आहे. फेलोशिपबाबत फसवणूक झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष धगधगत आहे. सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे.विद्यार्थ्यांना एमचआरडीच्या नॉर्मनुसार फेलोशिप देण्याऐवजी डीआरडीओच्या जुन्या नियमानुसार देऊन त्यांची एकप्रकारे फसवणूक करण्यात आली आहे. याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. संस्थेच्या निर्णयात बदल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे. आपल्या हक्काची फेलोशिप मिळवण्यासाठी आम्ही गेल्या चार दिवसांपासून उन्हातान्हात उभे राहून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. दि. २१ रोजी कुलगुरूंनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी फेलोशिपबाबत विचारणा केली असता, रकमेत वाढ करण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. वरिष्ठांकडून झालेल्या कार्यालयीन चुकीमुळे फेलोशिपचा मुद्दा वादग्रस्त ठरला आहे, अशी सारसासारव कुलगुरूंकडून करण्यात आली. मात्र, विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. व्यवस्थापनाच्या चुकीमुळे त्यांचा अभ्यासक्रम मागे पडत आहे, वेळ आणि शक्ती खर्च होत आहे. मात्र, डाएटच्या प्रशासनाला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. प्रशासनाने त्वरित तोेडगा न काढल्यास आंदोलन तीव्र करावे लागेल आणि बिघडत्या अवस्थेला प्रशासन कारणीभूत असेल, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.