पुण्यात चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 20:00 IST2021-07-04T19:59:53+5:302021-07-04T20:00:00+5:30

ओठाला व गालाला चावण्याचा घाणेरडा प्रकार करत तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला

Four-year-old Chimukali raped in Pune; Naradhamala was handcuffed by the police | पुण्यात चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुण्यात चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ठळक मुद्देमुलीस कुरकुरे देण्याच्या बहाण्याने खोलीत नेऊन बलात्कार केल्याचा धक्कदायक प्रकार समोर

लोणी काळभोर: एका नराधमाने चार वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस कुरकुरे देण्याच्या बहाण्याने खोलीत नेऊन बलात्कार केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. तिच्या ओठाला व गालाला चावण्याचा घाणेरडा प्रकार करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर बलात्कार केला असल्याची घटना ऊरूळी देवाची दूरक्षेत्राचे हद्दीत घडली आहे. 

मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून मनुकुमार मनोज सिंग ( वय २३, रा. मंतरवाडी ता.हवेली. मुळ रा. बिहार ) याला अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी मुळ उस्मानाबाद जिल्ह्यातील असून तिचे वडील ड्रायव्हर म्हणून काम करतात. सुमारे २ वर्षापासून ती आई, वडील व लहान भावासह या परिसरात राहत आहे. शनिवारी (३ जुलै) ला सकाळी ८- ३० वाजण्याच्या सुमारास वडील कामावर गेले. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आई घरात भांडी घासत होती. त्यावेळी मुलगी आपल्या एक वर्ष वयाच्या भावासमवेत घराबाहेर खेळत होती.

काही वेळानंतर आईने तिला आवाज दिला परंतु ती घराबाहेर दिसली नाही. तिचा शोध घेत असताना मुलगी वरच्या मजल्यावरुन खालच्या मजल्यावर येताना दिसली. आईने तिला घरात नेल्यावर सर्व काही विचारले. त्यावर मुलीने  सांगितले की, मला वरच्या मनुने कुरकुरे देवून त्याच्या खोलीत नेले. माझ्या ओठाला व गालाला चावला.

वडिल घरी जेवायला आल्यावर त्यांना आईने सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर मुलगी खुप दुखतय असे म्हणुन रडूही लागली तेव्हा तिच्या शरीराची बारकाईपाहणी केली असता ओठ सुजले होते. तसेच ओठातुन रक्त येत होते. गालाला चावलेल्या खुणा दिसत होत्या. म्हणून तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी नंतर डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाला असल्याचेे सांगितले.  आईने याबाबत फिर्याद देताच पोलीसांनी अटक केली असून त्याला ७ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास पोलीस अधीकारी निकेतन निबांळकर हे करत आहेत.

Web Title: Four-year-old Chimukali raped in Pune; Naradhamala was handcuffed by the police