शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे सातारा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू, आठ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 15:33 IST

मृत्यू झालेल्या दोघांमध्ये खासगी बसचा चालक आणि पुण्यातील नऊ वर्षीय मुलीचा समावेश

नसरापूर : भोर तालुक्यातील वरवे (ता. भोर) गावच्या हद्दीत पुणे सातारा महामार्गावर दोन कंटेनर , एक शिवशाही व आराम बस यांच्या झालेल्या चित्रविचित्र अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये शिवशाही बस मधील एका नऊ वर्षीय मुलीचा समावेश आहे. ऋतुजा रवींद्र चव्हाण वय ९ रा. खडकमाळ, उत्तमनगर व खाजगी बसचा चालक शिवराज कुमार एच आर रा. होसैहळ्ळी कर्नाटक या दोघांचा या अपघातातमृत्यू झाला आहे. आठ जण जखमी झाले आहेत.              या विचित्र अपघातात सुनंदा रवींद्र चव्हाण (वय ४२ खडकमाळ, उत्तमनगर), रत्ना रवींद्र पुजारी (वय ३८), रवींद्र रामा पुजारी( वय ४१ ) ( दोघेही रा. ठाणे मुंबई ), विना प्रभाकर गौडा (वय ३४), ज्योती जयराम गौडा (वय ३९),पर्वतमा देवे गौडा (वय ४२), हेमा अण्णा गौडा (वय ३५) सर्व रा. मुंबई ,मिनाक्षी मायशेट्टी गौडा (वय ३५),संजु रवी गौडा(वय २४), प्रदीप नज्जाप्पा गौडा (वय २५) अशी जखमींची नावे असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या जखमींना नसरापूर, कापूरव्होळ व शिवापूर येथे उपचारासाठी महामार्ग पोलिसांनी दाखल केले आहे.

याप्रकरणी महामार्ग मदत पोलीस केंद्राचे पोलीस अधिकारी असलम खतीब यांनी दिलेल्या माहिती नुसार, आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा महामार्गावर वरवे (ता. भोर) येथे रविवारी घटना घडली आहे. वरवे गावच्या हद्दीत हॉटेल सह्याद्रीच्या समोर कर्नाटकातून खासगी बस ही म्हैसूर कडून मुबंईकडे जात असताना नास्ता करण्यासाठी वळत असताना पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने खासगी बसला मागून जोरदार धडक दिली. लक्झरी बस महामार्गावर जागीच पलटी झाली. हा कंटेनर दुसऱ्या बाजूला म्हणजे साताऱ्याकडे जाणाऱ्या लेनवर गेला. त्यामुळे पुण्याकडून सांगलीला जाणारी शिवशाही बस ही अनियंत्रित झाल्याने ती अपघातग्रस्त झाली व त्याच वेळी पुण्याकडून साताऱ्याकडे जाणारा ट्रक हा सुद्धा अपघातग्रस्त झाला आहे. अपघात होताच महामार्ग व राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तीन क्रेन च्या साह्याने अपघातातील वाहने बाजूला करून जखमींना पाच रुग्णवाहिका मधुन जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताने वाहतूक कोंडी झाली होती तब्बल तीन तासांनी वाहतूक सुरळीत झाली. यावेळी महामार्गाच्या दुतर्फा वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. जखमीवर नसरापूर, शिवापूर व कापुरव्होळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.                  या अपघातात लक्झरी चालक शिवराज कुमारचा जागीच मृत्यू झाला. तर धडक दिलेला कंटेनर हा सातारा बाजूकडे जाणाऱ्या दिशेने महामार्गावर घुसला. व पुणे बाजूकडून येणाऱ्या कंटेनरला धडकला व तो कंटेनर शेजारून जाणाऱ्या शिवशाही बसला धडकला. व शिवशाही बस मधील नऊ वयाची मुलगी क्रुतुजा गंभीर जखमी होऊन मृत्यू पावली. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातhighwayमहामार्गDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस