शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रसंगी चौघे होते हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 20:15 IST

सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनाही डॉ. दाभोलकर कोण आहेत हे माहिती नव्हते, त्यामुळे त्यांची ओळख पटवून देण्यासाठी २० आॅगस्ट २०१३ रोजी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळी सव्वासात वाजण्याच्या आधीच दोनजण उपस्थित होते.

ठळक मुद्देघटनास्थळी थांबलेल्या दोघांनी हल्लेखोरांना डॉ. दाभोलकरांची ओळख पटवली, सीबीआयची माहितीवैभव राऊत आणि शरद कळसकर यांच्याकडे चार पिस्तूलकळसकर सोबत राहण्याची परवानगी द्या : वकिलांची मागणी

पुणे : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची दुचाकीवरून आलेल्या शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यांना मदत करण्यासाठी घटनास्थळी दोघेजण आधीच येवून थांबले होते, असा दावा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी न्यायालयात केला. त्यामुळे डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रसंगी घटनास्थळी चौघेजण हजर होते, असे पुढे येते आहे.      याप्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकर याला कोठडीची मूदत संपत असल्याने न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या कोठडीत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी दिले. आतापर्यंत दोनच हल्लेखोर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सीबीआयने न्यायालयात दावा केला की, हल्लेखोर शरद कळसकर याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशी दरम्यान, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनाही डॉ. दाभोलकर कोण आहेत हे माहिती नव्हते, त्यामुळे त्यांची ओळख पटवून देण्यासाठी २० आॅगस्ट २०१३ रोजी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळी सव्वासात वाजण्याच्या आधीच दोनजण उपस्थित होते. कळसकर आणि अंदुरे दुचाकीवरून पुलावर पोहचल्यानंतर आधिच घटनास्थळी येवून थांबलेल्या त्यांच्या दोन साथीदारांनी पुलावर असलेल्या व्यक्तींपैकी डॉ. दाभोलकर कोण आहेत हे त्यांना सांगितले. सदर दोघांकडून डॉ. दाभोलकर यांची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर कळसकर आणि अंदुरे यांनी गोळ्या झाडल्या आहेत.        कळसकर आणि अंदुरेला दाभोलकरांची ओळख पटवून देणारे दोघेजण खूनाच्या कटात सहभागी होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. सदर दोघांचा सीबीआयने तपास सुरू केला असून त्याकरिता कळसकर यांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयचे विशेष सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांनी केली. सीबीआयच्या तपासात प्रगती असल्याचे न्यायालयाच्या निर्देशनास आल्याने, न्यायालयाने कळसकर याच्या पोलीस कोठडीत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान कळसकर याला एटीएसने अटक केली तेव्हा त्याच्याकडून बंदूक आणि दुचाकी जप्त करण्यात आहे. त्यामुळे त्याच्याकडून हस्तगत करण्यासारखी कोणतीही वस्तू राहिलेली नाही. त्यामुळे त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करावी, अशी मागणी त्याचे वकील धर्मराज चंडेल यांनी केली. .........................राऊत, कळसकरकडून चार पिस्टलची विल्हेवाटवैभव राऊत आणि शरद कळसकर यांच्याकडे चार पिस्तूल होते. त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी ते २३ जुलै २०१८ रोजी राऊत याच्या नालासोपारा येथील घरातून दुचाकीवर निघाले. त्यानंतर पिस्तुल तोडून त्याचे तुकडे मुंबईतील एका पुलावरुन खाडीच्या पाण्यात टाकून दिले. हे तुकडे ज्याठिकाणी फेकण्यात आले ती जागा ठाणे येथील कळवा पुल, वसईतील भार्इंदर पुल किंवा कल्याण खाडी पुल यापैकी एक जागा आहे. मात्र, रात्रीच्या वेळी पिस्तुलचे तुकडे खाडीच्या पाण्यात फेकून दिल्याने नेमकी जागा कळसकर याला आठवत नाही. त्याबाबत प्रत्यक्ष जागेवर पुन्हा नेऊन अधिक चौकशी करावयाचे असल्याचे सीबीआयचे वतीने न्यायालयात सांगण्यात आले. फेकून देण्यात आलेल्यापैकी एक पिस्तूल डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरले असावे, असा सीबीआयचा अंदाज आहे. ...........................कळसकर सोबत राहण्याची परवानगी द्या : वकिलांची मागणीअमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांच्याकडे सीबीआय कोठडीत असताना कोल्हापूर एसआयटीकडून कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येबाबत तपास करण्यात आलेला आहे तर दिगवेकर याला मारहाण झाली आहे. त्यामुळे कळसकर याच्या कोठडीचा देखील गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे कळसकर याला पोलीस कोणत्या प्रकारे त्रास देत नाही ना अथवा त्याचेकडे दुस-या तपास यंत्रणा तपास करताय का यावर लक्ष्य ठेवण्याकरिता कळसकरचे वकील धर्मराज चंडेल यांनी न्यायालयात अर्ज करून आरोपी सोबत राहण्याची परवानगी मागितली आहे. तपासात ढवळाढवळ होणार नाही. तसेच पोलिसांनी आरोपीकडे चौकशी करताना त्याच्यांमधील संभाषण ऐकू येणार नाही इतके अंतर ठेवण्यात, येईल असे सांगितले असून त्याकरिता सर्वोच्च न्यायालयाचे एका केसचा दाखला त्यांनी न्यायालयात सादर केला. मात्र बचाव पक्षाच्या वकिलांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरCBIगुन्हा अन्वेषण विभाग