पुण्याजवळ कार-ट्रकचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 11:36 IST2017-12-11T10:27:50+5:302017-12-11T11:36:21+5:30
पुणे-सातारा रस्त्यावर जांभुळवाडी येथे दरीपुलाजवळ सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ट्रक आणि कारमध्ये झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पुण्याजवळ कार-ट्रकचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू
पुणे : पुणे-सातारा रस्त्यावर जांभुळवाडी येथे दरीपुलाजवळ सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ट्रक आणि कारमध्ये झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
ऋषी केश यशवंत माने (वय 20), यशवन्त पांडुरंग माने (वय 60), शारदा यशवन्त माने ( सर्व रा. चुनभट्टी, मुंबई) आणि रामचंद्र कृष्णा सुर्वे (वय 71, रा सायन) अशी मृतांची नाव आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, माने हे मूळचे सातारा येथील राहणारे आहेत. त्यांची मुलगी सातारा येथे शिक्षण घेत आहे. तिला सोडून ते पुन्हा मुंबईला जात होते. ऋषीकेश गाडी चालवत होता. कात्रज येथील नवीन बोगदा पार करून गाडी पुण्याकडे येत असताना उतारावर तिची धडक पुढे जात असलेल्या कंटेनर ला बसली. धडक इतकी जोरदार होती की त्यात गाडीतील चारही जणांचा मुत्यू झाला.