Four lakhs theft from of house at Loni kalbhor | लोणी काळभोर येथे भरदिवसा केली चार लाखांची घरफोडी

लोणी काळभोर येथे भरदिवसा केली चार लाखांची घरफोडी

लोणी काळभोर : घरात कोणीही नाही याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा दागिणे व रोख रक्कम असा एकूण ४ लाख २८ हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करुन चोरल्याची घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट येथे घडली आहे.
याप्रकरणी सागर बाळासाहेब कदम ( वय ३१, रा.कवडीपाट, कदमवाकवस्ती ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रकार १४ जानेवारी रोजी दुपारी ३ - ३० ते सायंकाळी ६ वाजण्याचे दरम्यान घडला आहे. सागर कदम हे नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. तर त्यांच्या पत्नी माहेरी होत्या.  आईवडील घराचे पाठीमागील दरवाजाला कुलूप लावून चावी घराचे खिडकीचे खाचेमध्ये ठेवून शेतात गेले होते. शेतातील काम उरकून ते सायंकाळी ६ वाजण्याचे सुमारास घरी परत आले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात जावून पाहीले असता घरातील बेडरुममध्ये असलेले लोखंडी व लाकडी कपाटांचे दरवाजे उचकटलेले होते. त्यानंतर त्यांनी ही बाब सागर यांना कळवली. ते आलेनंतर घरांतील दोन्ही कपाटांची पाहणी केली असता दोन्ही कपाटांची दरवाजे चोरटयाने उचकटून उघडलेले होते. 
तसेच कपाटातील कप्पे, लॉकर उचकटून त्यातील साहीत्य तसेच दागिन्यांच्या मोकळया डब्या बाहेर अस्ताव्यस्त टाकलेले होते. त्यांनी गेलेले  ऐवजाची खात्री केली असता एकूण ४ २८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला असल्याची 
खात्री झालेनंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Four lakhs theft from of house at Loni kalbhor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.