शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

पीक कर्जात चार कोटींचा घोटाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 01:23 IST

शिरूर ग्रुप सोसायटीमध्ये शेतकऱ्यांच्या पीक कर्जातील रकमेत तब्बल ४ कोटी २१ लाख रुपयांचा घोळ झाला आहे. कर्जापोटी भरलेले हप्ते बँक खात्यात जमा न करता हडप केले.

पुणे : शिरूर ग्रुप सोसायटीमध्ये शेतकऱ्यांच्या पीक कर्जातील रकमेत तब्बल ४ कोटी २१ लाख रुपयांचा घोळ झाला आहे. कर्जापोटी भरलेले हप्ते बँक खात्यात जमा न करता हडप केले. सोसायटीचे संचालक, सचिव आणि जिल्हा बँकेच्या अधिका-यांनी संगनमताने हा घोटाळा केला असल्याचे सहकार खात्याने नियुक्त केलेल्या लेखापरीक्षकांनी स्पष्ट केले असून, संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.शिरूर ग्रुप विविध कार्यकारी सोसायटीत २००९ ते २०१५ या कालावधीत ४ कोटी २१ लाख ७५ हजार २४५ रुपयांचा पीक कर्ज रकमेचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी नेमलेले लेखापरीक्षक राजेश भुजबळ यांनी सोसायटीच्या ६१९ शेतकºयांना पत्र पाठवून त्यांच्या पीक कर्ज खात्याबाबत सुनावणी घेतली. त्यातील ५३१ खातेदारांना सचिव चंद्रकांत सांगळे यांच्याकडे कर्ज परतफेडीसाठी रकमा जमा केल्या. सांगळे यांनी किसान क्रेडिट कार्डवर नोंद घेऊन पैसे जमा केल्याचे दाखविले. प्रत्यक्षात जिल्हा बँकेत पैसे जमा केले नाहीत, तसेच रकमेची पावती दिली नसल्याचे सुनावणीत स्पष्ट झाले.पीक कर्जाचे पैसे जमा झाले नसल्याने सदर शेतकºयांची पीक कर्जखाती थकबाकीत गेली असे असताना सदर शेतकºयांना नव्याने पीक कर्ज देताना जिल्हा बँकेच्या नियमानुसार प्रत्येक सभासदाचे ई-करारपत्र, कर्जरोखा आणि कर्जवाटप तक्ता यानुसार भरणा झाला आहे की नाही, याची खात्री करुन नवे कर्ज दिले जाते. त्याची खातरजमा बँकेचा इन्स्पेक्टर करतो. त्यानंतर वाटप तक्ता मंजूर होतो. त्यावर संचालक मंडळापैकी दोन जण बँक इन्स्पेक्टर आणि सचिव यांच्या सह्या घेतल्या जातात. त्यानंतर बँक इन्स्पेक्टर त्याची खात्री करून पीक कर्ज वाटपाला मंजुरी देतो, असे असताना पीक कर्जाचे वसूल केलेले पैसे बँकेत न भरता त्याचा अपहार केला आहे.लेखापरीक्षक भुजबळ यांनी प्रत्यक्षात १२६ शेतकºयांची पीक कर्जखाती तपासली. त्या शेतकºयांनी रकमा दिल्या, पण त्या खात्यात जमा न केल्याने ती खाती थकीत असताना कर्जवाटप तक्त्यात खोटी माहिती देऊन त्यांना नव्याने पीक कर्ज देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे हे या सोसायटीचे शेतकरी सभासद आहेत. त्यांनी या घोटाळ्याबाबत गप्प राहण्याची भूमिका का घेतली, अशी विचारणा होत आहे.नव्याने पीककर्ज देण्यासाठी संचालक, सचिव आणि जिल्हा बँकेचे इन्स्पेक्टर यांनी संगनमताने खोटी कागदपत्रे कर्ज मंजुरीचा तक्ता करून नव्याने कर्ज दिली.हा घोटाळा करताना या तीन जणांचे संगनमत असल्याचे लेखापरीक्षकांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.