four beat boy for is rubbed on his hand | हातावर चहा सांडला म्ह्णून केले कोयत्याने वार 
हातावर चहा सांडला म्ह्णून केले कोयत्याने वार 

पुणे : भांडणाला खरं तर कोणतंही कारण पुरेसं असतं असं म्हटलं जातं. याचंच उदाहरण पुण्यात बघायला मिळालं असून हातावर चहा सांडल्याच्या कारणावरून एका व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे.हातावर चहा सांडल्याच्या कारणावरून चार जणांनी एकाला बेदम मारहाण करत कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास रहाटणी येथे घडली. याप्रकरणी वाकडपोलिसांनी एकाला अटक केली आहे.

  राधेशाम भवरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह घोलप आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौशल कैलास मौर्य (वय १८, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कौशल त्यांचा मित्र शिवम ठाकूर आणि अन्य दोन मित्रांसोबत शिवार चौकात नाष्टा करण्यासाठी गेले. त्यावेळी शिवम यांच्या हातावर चहा सांडला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कौशल यांना आरोपींनी मारहाण केली. राधेशाम याने कौशल यांच्या डोक्यावर, पायावर कोयत्याने वार केले. यामध्ये कौशल गंभीर जखमी झाले. तर, आरोपीच्या अन्य साथीदारांनी गट्टू फेकून मारले. याबाबत वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: four beat boy for is rubbed on his hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.