हातात अजितदादांचा फोटो अन् अंगावर फक्त लंगोट; देवराम लांडेंच्या विजयाच्या जल्लोषाची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 14:36 IST2026-02-09T14:10:55+5:302026-02-09T14:36:34+5:30

मोनाली लांडे यांच्या विजयानंतर देवराम लांडे थेट लंगोटवर मिरवणुकीत सहभागी झाले होते.

Former ZP Chief Devram Lande Celebrates Victory in Langot with Ajit Pawar Photo | हातात अजितदादांचा फोटो अन् अंगावर फक्त लंगोट; देवराम लांडेंच्या विजयाच्या जल्लोषाची सर्वत्र चर्चा

हातात अजितदादांचा फोटो अन् अंगावर फक्त लंगोट; देवराम लांडेंच्या विजयाच्या जल्लोषाची सर्वत्र चर्चा

Pune ZP Election: राजकारणात विजयाचा जल्लोष अनेक प्रकारे साजरा केला जातो, पण जुन्नरचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांनी केलेल्या कृतीमुळे ते चर्चेत आले आहेत. बारव-तांबे गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मोनाली अमोल लांडे यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर, सासरे देवराम लांडे यांनी थेट लंगोटवर विजयाचा उत्सव साजरा केला. त्यांच्या या अनोख्या स्टाईलमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात या निकालाची चर्चा रंगली आहे.

देवराम लांडे यांचा हा जुना बालेकिल्ला आहे. या निवडणुकीत आपली सत्ता टिकवण्यासाठी त्यांनी प्रचारात जीवाचे रान केले होते. विजय निश्चित होताच समर्थकांनी मोठा जल्लोष केला. यावेळी समर्थकांच्या हातात असलेल्या पोस्टर्सवर "जंगल भी वही है और राजा भी वही रहेगा!" असा  मजकूर लिहिला होता, जो थेट विरोधकांना दिलेले आव्हान मानले जात आहे. 

अजितदादांच्या फोटोसह लंगोटवर जल्लोष

मिरवणुकीत देवराम लांडे यांच्या हातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो होता. या फोटोवर आपला दादा सदैव स्मरणात अशी भावनिक ओळ लिहिलेली होती. अजित पवारांबद्दलची निष्ठा आणि विजयाचा आनंद अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्यक्त करणाऱ्या लांडे यांची ही मिरवणूक पाहण्यासाठी जुन्नरकरांनी मोठी गर्दी केली होती.

देवराम लांडे हे आपल्या विधानांमुळे किंवा कृतीमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. जुना 'तांबे-पाडळी' आणि आताचा 'बारव-तांबे' गट हा लांडे कुटुंबाचा मजबूत गड मानला जातो. यंदाच्या निवडणुकीत हा गड राखणे प्रतिष्ठेचे होते, जे त्यांनी यशस्वी करून दाखवले.

Web Title : अजित पवार की तस्वीर के साथ लंगोट में समर्थक ने मनाई जीत।

Web Summary : पुणे जिला परिषद चुनाव में अपनी बहू की जीत का देवराम लांडे ने अनोखे अंदाज में जश्न मनाया। उन्होंने अजित पवार की तस्वीर पकड़े हुए, लंगोट में परेड की, निष्ठा और खुशी का प्रदर्शन किया। इस जीत ने लांडे परिवार के राजनीतिक गढ़ को मजबूत किया।

Web Title : Supporter Celebrates Victory in Loincloth with Ajit Pawar's Photo.

Web Summary : Devram Lande celebrated his daughter-in-law's victory in Pune ZP elections uniquely. He paraded in a loincloth, holding a photo of Ajit Pawar, showcasing loyalty and joy. The victory strengthens Lande's family's political stronghold.