माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 10:37 IST2022-07-01T10:25:28+5:302022-07-01T10:37:09+5:30

गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या...

former Minister of State Dattatraya Bharane mother girijabai bharne pass away | माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने निधन

माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने निधन

कळस (पुणे): भरणेवाडी (ता. इंदापूर) येथील माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरिजाबाई विठोबा भरणे (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना धार्मिक व सामाजिक कार्याची आवड होती. प्रतिकूल काळात एकत्रित कुटुंब टिकवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.

शुक्रवारी (दि. १) त्यांनी अखेरचा श्वास घेतला भरणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा यांचे गेल्या दीड वर्षांपूर्वी निधन झाले असून आता आईचे छत्रही हरपले आहे. गिरिजाबाई यांच्या पश्चात रामचंद, आबासाहेब, मधुकर व दत्तात्रय ही चार मुले तर साळुबाई, कुसुम व हिराबाई अशा तीन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान गिरिजाबाई यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे . दुपारी २ वाजता भरणेवाडी येथील निवासस्थानानजीक त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Web Title: former Minister of State Dattatraya Bharane mother girijabai bharne pass away