Pune: पुण्यातील माजी नगरसेवकांचे अजित पवार गटात इनकमिंग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 11:09 IST2023-07-05T11:08:58+5:302023-07-05T11:09:51+5:30

पुण्यातून राष्ट्रवादी नेते, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आता थेट अजित दादांसोबत जाण्यास सुरुवात झाली आहे...

Former corporators from Pune are starting to join the Ajit Pawar group | Pune: पुण्यातील माजी नगरसेवकांचे अजित पवार गटात इनकमिंग सुरू

Pune: पुण्यातील माजी नगरसेवकांचे अजित पवार गटात इनकमिंग सुरू

- जयवंत गंधाले 

हडपसर (पुणे) : पुण्यातून पहिला माजी नगरसेवक आनंद आलकुंटे हे अजित पवार यांच्या सत्कारासाठी मुंबईला जाऊन आले. माजी नगरसेवक आलकुंटे यांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे पुण्यातून राष्ट्रवादी नेते, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आता थेट अजित दादांसोबत जाण्यास सुरुवात झाली आहे.

पुणे शहराचा आणि उपनगरांचा विचार केला तर गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामध्येही हडपसरमधूनच त्यांना सोबती मिळण्यास सुरुवात झाली होती. त्याचप्रमाणे यावेळीही अजितदादांना हडपसरच्या माजी नगरसेवकांने पाठिंबा दर्शवल्याने हडपसर हे राजकीय समीकरणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. तसेच हडपसरमध्ये आतापर्यंत अनेक वेळा महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सदस्य अशी पद मिळाले आहेत. या भागात राष्ट्रवादीचे नगरसेवक मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे आगामी काळातही हडपसर हे एक राजकीय समीकरण ठरवणारे उपनगर सिद्ध होईल हे नक्की.

Web Title: Former corporators from Pune are starting to join the Ajit Pawar group