पुण्यातील विमाननगर प्रभागाचे माजी नगरसेवक भीमराव खरात यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 14:16 IST2021-05-26T14:16:18+5:302021-05-26T14:16:24+5:30
राष्ट्रवादी पक्षाकडून २००७ मध्ये आले होते निवडून

पुण्यातील विमाननगर प्रभागाचे माजी नगरसेवक भीमराव खरात यांचे निधन
येरवडा: पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे वडगावशेरी विधानसभा अध्यक्ष भीमराव सुखदेव खरात(वय 65) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
विमाननगर प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून २००७ मध्ये ते पुणे महापालिकेवर निवडून गेले होते. येरवडा, नागपूर चाळ, वडगावशेरी परिसरातील विविध आंबेडकरी संस्था संघटनाशी त्यांचा निकटचा संबंध होता. सध्या ते भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित मोर्चाचे वडगावशेरी विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते बुद्धम् खरात व रमेश खरात यांचे ज्येष्ठ बंधू होते.