पुण्यात माजी नगरसेविकेला धमकावून बलात्कार; दहा लाखही उकळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 12:20 IST2023-10-05T12:20:01+5:302023-10-05T12:20:15+5:30
2017 पासून आरोपी काकडे यांनी नगरसेविकेला धमकावून अत्याचार केली असल्याची माहिती उघड

पुण्यात माजी नगरसेविकेला धमकावून बलात्कार; दहा लाखही उकळले
पुणे : मैत्री संबंधातून काढलेले फोटो वायरल करण्याची धमकी देत पुण्यात माजी नगरसेविकेवर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन मच्छिंद्र काकडे असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपी काकडे आणि माजी नगरसेविका हे अनेक दिवसापासून एकमेकांचे मित्र होते. 2017 पासून आरोपी काकडे यांनी नगरसेविकेला धमकावून अत्याचार केली असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यासोबतच संबंधित नगरसेविकेकडून आरोपीने दहा लाख रुपये उकळले असल्याचे समोर आले आहे. पतीला मैत्री संबंध बाबतची माहिती देऊन फोटो समाज माध्यमात वायरल करण्याची धमकी देखील आरोपीने दिली होती.