शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

वणव्यावर लक्ष ठेवण्यासाठी आता वन विभागाच गस्त घालणार; वनपालापासून वन अधिकारी सहभागी असणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 6:32 PM

कात्रज बोगद्यालगतच्या डोंगरावर बुधवारी रात्री सात वाजता वणवा लागला होता. हा वणवा प्रचंड असल्याने तो वेगाने पसरला आणि शेकडो एकर जागेवरील गवत जळून गेले. वनपालापासून वन अधिकारी सहभागी असणार

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्हा परिसरात वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आता वन विभागातर्फे गस्त घालण्यात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय घेतला असून, लवकर गस्त सुरू करू, असे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कात्रज बोगद्यालगतच्या डोंगरावर बुधवारी रात्री सात वाजता वणवा लागला होता. हा वणवा प्रचंड असल्याने तो वेगाने पसरला आणि शेकडो एकर जागेवरील गवत जळून गेले. सध्या हिवाळा असतानाही वणवा कसा लागतो ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे वणवे मानवनिर्मित असण्याची दाट शक्यता आहे. खरंतर वणव्याने डोंगरावरील, वनातील जैवविविधता, वन्यजीव, कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी आदी नष्ट होतात. विशेषत: औषधी वनस्पतीही नामशेष होतात. वणवा डोंगर व जंगल उजाड करतो. झाडांचा बळी घेतो. नवीन रोपे व बी नष्ट करतो. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी करतो. पाण्याचे प्रवाह कोरडे करतो. निसर्गाची व वन्यजीवांची अपरिमित हानी होते यात अनेक दुर्मीळ प्रजाती नष्ट होतात, या विषयी जागृती करणे आवश्यक आहे.

वणव्याची मानवनिर्मित कारणे :* मोहाची फुले वेचताना जमिनीवरील पानांचा त्रास होतो म्हणून त्याला आग लावतात.* शेतातील गवत पेटवले तर नवीन गवत चांगले येईल, असा गैरसमज असल्याने अनेकजण गवत पेटवतात.  * वन क्षेत्राशेजारी शेती असेल तर तेथेही जमीन स्वच्छ करण्यासाठी आग लावली जाते.* वन क्षेत्रात किंवा जंगलात पर्यटनासाठी आलेले पर्यटक, जंगलात फिरणारे गुराखी  व इतर विडी, सिगारेट आगकाडीचे थोटूक फेकून देतात. त्याने आग लागते. मध जमा करणारे टेंभे घेऊन जातात आणि तिथेच टाकतात.

नैसर्गिक कारणे* विजेच्या तारा एकमेकांना चिकटून ठिणग्या गवतावर पडतात आणि वणवा पेटतो.

पारंपारिक उपाय अपुरेझाडाची फांदी तोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला जातो. आगीचा इशारा देणारे सेन्सर्सचे जाळे उभारून कमी खर्चात आगीची माहिती मिळू शकते. तसेच उपग्रहाद्वारे वणवा लागल्याबरोबर इशारा देणारी यंत्रणा आहे. पण याचा अधिक उपयोग करायला हवा. तसेच ब्लोअर यंत्राचा वापर होतो. पण त्याचा ही फायदा होत नाही. --------------------------------नागरिकांनी कुठेही वणवा लागला तरी त्याची माहिती त्वरित वन विभागाला द्यावी. अन्यथा १९२६ या वन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. - राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे विभाग --------------

टॅग्स :Puneपुणेfireआगforestजंगलforest departmentवनविभाग