शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कन्हेरी येथे वन विभागाची कारवाई; तीन एकरावरील अतिक्रमण काढले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 20:46 IST

कन्हेरी परीसरातील वनपरिक्षेत्रात तीन एकरांवरील अतिक्रमण काढले

ठळक मुद्देआरोपींनी अवैध आदेशाच्या आधारे वनक्षेत्रातील राखीव वनक्षेत्रापैकी पाच एकर क्षेत्राची खरेदी विक्रीचा व्यवहार केला.

बारामती: कन्हेरी (ता .बारामती)येथील वनपरीक्षेत्रातील तीन एकरांवरिल अतिक्रमण काढत वन विभागाने धडक कारवाई केली .तालुक्याचे प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी याबाबत माहिती दिली.

त्यानुसार बारामती तालक्यातील मौजे कन्हेरी वनक्षेत्रात राखीव वन सर्व्हे नंबर ४३ त्याचा बदलेला सर्व्हे नंबर ६३ त्याचा सध्याचा गट नंबर २९३ मध्ये राखीव वनक्षेत्रापैकी क्षेत्र ५ एकर एवढे भगवान देवबा क्षिरसागर (रा .काटेवाडी, ता.बारामती )व मारुती विष्णु भिसे या आरोपींनी एकमेकांच्या संगनमताने व सहकार्याने गुन्हा केला .तत्कालीन पुणे विभागीय  आयुक्त यांचे अवैधरीत्या आदेशान्वये भारतीय वन अधिनियम १९२७ व वनसंवर्धन अधिनियम १९८० च्या कायद्याचा भंग करून वन गुन्हा केला. प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.

दत्तात्रय निवृत्ती पाटोळे (रा.काटेवाडी ता.बरामती) वनगन्हा दाखल केलेवरून कन्हेरी राखीव वन सर्वे नंबर ६४ सध्याचा गट नंबर २८९ या राखीव वनक्षेत्रावर वरील आरोपीने 0.32 हेक्टर आर अतिक्रमण निष्कासित केले.

किशोर हंसराज पाचंगे व दत्तात्रय निवृत्ती पाटोळे यांनी फॉगट नंबर २८९ सर्वे नंबर ६४ मधील ४३ गुंठे शेतीचे अतिक्रमण हटविले.भगवान देवबा क्षिरसागर  यांनी राखीव वन सर्व्हे नंबर ६४ त्याचा सध्याचा गट नंबर ०.२३ हे. अतिक्रमण काढले.तसेच वन सर्व्हे नंबर ६३ मध्ये १६ गंठे अतिक्रमण केलेले क्षेत्र अतिक्रमण काढून ताब्यात घेतले.

या कारवाईत बारामतीचे वनपाल हेमंत मोरे, मोरगावचे वनपाल अमोल पाचपुते, करंजेचे वनपाल प्रकाश चौधरी, बारामतीच्या वनरक्षक मीनाक्षी गुरव, शिर्सुफळचे वनरक्षक अनिल माने, पिंपळीच्या वनरक्षक संध्या कांबळे यांच्यासह दौंड व इंदापूर वनपरिक्षेत्रातील ५० वन कर्मचा-यांनी सहभाग घेतला. विशेष शासकीय अभियोक्ता अभिजित साकुरकर यांनी कायदेशीर मार्गदर्शन केले. 

 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी