शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी तरुणीची मुंढव्यात छेडछाड

By admin | Updated: August 27, 2015 04:55 IST

रशियन तरुणीसोबत अश्लील वर्तन केल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणीच्या मित्रांवर रोडरोमिओने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना

पुणे : रशियन तरुणीसोबत अश्लील वर्तन केल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणीच्या मित्रांवर रोडरोमिओने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास मुंढवा रेल्वे स्थानकाजवळील हॉटेल बीच हाऊसमध्ये घडली. मुंढवा पोलिसांनी विनयभंगासह खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणाऱ्या तरुण-तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.अली सोहन चकलानी ऊर्फ मेमन (वय २७, रा. समृद्धी अपार्टमेंट, ईस्ट स्ट्रीट, लष्कर) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी जय हरेश सुमय्या (३८, आॅलिम्पिक टॉवर्स, लोखंडवाला, अंधेरी पूर्व, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. सुमय्या यांच्यासह त्यांचे मित्र विवेन केदारी, आलाप जोशी जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकलानी याच्या वडिलांचे हार्डवेअरचे दुकान आहे. तो वडिलांना दुकानात मदत करतो. तर सुमय्या त्यांचे दोन मित्र व रशियन मैत्रिणीसह व्यवसायानिमित्त पुण्यात आले होते. मुंबईमध्ये राहणारे हे सर्व जण भागीदारीत हॉटेल व्यवसाय करतात. रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास सुमय्या त्यांचे दोन मित्र व एका मैत्रिणीसह हॉटेल बीच हाऊसमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते, त्या वेळी आरोपी चक लानी याने सुमय्या यांच्या मैत्रिणीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला.सुमय्या यांनी त्याला हटकले. यावर चिडलेल्या आरोपीने तरुणीशी अश्लील वर्तन केले. सुमय्या आणि आरोपीमध्ये वाद सुरू झाला. आरोपी चकलानी याने पळत जाऊन हॉटेलच्या स्वयंपाक घरामधून सुरी आणली. जिवे मारण्याची धमकी देऊन सुमय्या यांच्या डोक्यात वार केले. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांवरही त्याने वार केले. यातील विवेन केदारी यांच्या नाकाला, तर आलाप जोशी यांच्या डाव्या हातावर वार करून चकलानी पसार झाला. या हल्ल्यामधून तरुणी बचावली. सुमय्या यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मुंढवा पोलिसांनी याप्रकरणी रविवारी रात्री सव्वाच्या सुमारास गुन्हा दाखल केला. दिवसभरात शोध घेऊन रात्री पावणेदहाच्या सुमारास चकलानी याला बेड्या ठोकण्यात आल्या. छेडछाड रोखण्यासाठी मैत्रिणीला मदत करायला गेलेल्या तरुणावर रोड रोमिओकडून प्राणघातक हल्ला झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत कामानिमित्त घराबाहेर असलेल्या तरुण-तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्याच आठवड्यात विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकतर्फी प्रेमातून कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता. एक लाख रुपयांची सुपारी देऊन हा हल्ला घडवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही घटना ताजी असतानाच मुंढव्यातील घटना घडल्यामुळे तरुणींमध्ये भीतीचे वातावरण पसरत चालले आहे. महिला पोलिसांची गस्त, छेडछाडविरोधी पथक नेमके काय करीत आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.