Pune | पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 14:47 IST2022-12-16T14:43:02+5:302022-12-16T14:47:58+5:30
याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे....

Pune | पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने बलात्कार
घोडेगाव (पुणे) : लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने एका मुलीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले म्हणून धोंडमाळ (ता. आंबेगाव) येथील प्रतीक सतीश आवटे याच्यावर घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतीक आवटे याने धोंडमाळ येथे आपल्या राहत्या घरी व घोडेगावमधील भाड्याच्या खोलीमध्ये या मुलीवर सहा महिने शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादी मुलीने तक्रारीत म्हटले आहे की, आपणास लग्नाचे आमिष दाखवून व आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.