शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नरमध्ये अन्नातून विषबाधा; जेवणाच्या भांड्यात मेलेली पाल आढळल्यानंतर ३० मजुरांची प्रकृती बिघडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 17:02 IST

- सर्व मजूर बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराधीन

वडगाव आनंद (पुणे जि. ) :पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मंगरूळ येथे शुक्रवारी अन्नातून विषबाधेची गंभीर घटना उघडकीस आली. कांदा काढणीसाठी वाशिम जिल्ह्यातून आलेल्या सुमारे ३० ते ३५ मजुरांना जेवणानंतर अचानक त्रास सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे.अधिकच्या माहितीनुसार, सध्या परिसरात कांदा काढणीचा हंगाम सुरू असून मोठ्या संख्येने परराज्यातील मजूर येथे दाखल झाले आहे. शुक्रवारी दुपारी सर्व मजूर जेवण करत असताना एका भांड्यात मेलेली पाल आढळून आली. ही बाब लक्षात येताच मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जेवणानंतर काही वेळातच अनेक मजुरांना मळमळ, चक्कर आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागला. परिस्थितीची गंभीरता ओळखून सर्व बाधितांना तातडीने बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यामध्ये महिला, पुरुष तसेच लहान मुलांचाही समावेश आहे.आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकाने तात्काळ उपचार सुरू केले असून, सर्व मजुरांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही रुग्णांना पुढील उपचारासाठी नारायणगाव किंवा मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील मजुरांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः हंगामी कामांसाठी येणाऱ्या मजुरांच्या राहणीमान आणि जेवणाच्या स्वच्छतेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे