शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

गुजर-निंबाळकरवाडीत डोंगर पोखरून प्लॉटिंग

By admin | Updated: August 2, 2014 04:08 IST

शहराच्या दक्षिण हद्दीतील गुजर-निंबाळकरवाडीचा समावेश पालिका हद्दीत करण्याची अधिसूचना नुकतीच काढण्यात आली.

हणमंत पाटील, पुणेशहराच्या दक्षिण हद्दीतील गुजर-निंबाळकरवाडीचा समावेश पालिका हद्दीत करण्याची अधिसूचना नुकतीच काढण्यात आली. त्यामुळे डोंगर पोखरून प्लॉटिंग करणे आणि त्यावर बांधकामाचे अनधिकृत मजले चढविण्याच्या कामांना वेग आला आहे. मात्र, जिल्हाधिकारी अथवा पालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेचे त्यावर कोणतेही नियंत्रण नाही. माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने शहराच्या हद्दीलगतच्या डोंगर व टेकड्यांची पाहणी केली. त्यावेळी कात्रज डोंगर दरीच्या भागातील गुजरवस्ती व निंबाळकरवाडी भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू असल्याचे दिसून आले. पालिकेच्या हद्दीलगत अवघ्या दोन ते पाच किलोमीटरवर ही गावे आहेत. आज ना उद्या महापालिकेच्या हद्दीत समावेश होईल तसेच, मुंबई महामार्गाच्या हद्दीलगतची ही गावे असल्याने बांधकाम व्यावसायिकांनी मातीमोल भावाने शेतजमिनी व टेकड्या अगोदरच खरेदी करून ठेवल्या आहेत. निंबाळकरवाडी रस्त्यालगतच्या टेकड्या पोखरून प्लास्टिक, स्टील, सिमेंट व लोखंडाचे कारखाने व छोटे व्यवसाय सुरू आहेत. त्यामुळे परिसरात रोजगारासाठी अनेक ठिकाणाहून याठिकाणी स्थलांतरित झालेल्या नागरिकांनी एक ते दोन गुंठ्यांच्या जागेत एक-एक मजले अनधिकृत बांधकामे करून भाड्याने दिले आहेत. या दोन्ही गावांचा समावेश होणार असल्याची अधिसूचना दोन महिन्यांपूर्वी काढली तरी अंतिम अध्यादेश काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून डोंगर व टेकड्या पोखरून एक ते दोन गुंठ्यांच्या प्लॉटिंगचा वेग वाढला आहे. तसेच ज्यांची बैठी घरे आहेत, त्यांनी महापालिकेच्या हद्दीत समावेश होण्यापूर्वी तातडीने मजले वाढविण्याची कामे सुरू केली आहेत. गुजर-निंबाळकरवाडीच्या डोंगर उतारावरील नैसर्गिक ओढे व नाल्यातही ठिकठिकाणी बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नाले गायब आहेत. त्यामुळे संततधार पावसाळ्यात नाल्यातील घरांना धोका पोहचण्याची आणि दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. त्यामुळे डोंगर उतारावर खुलेआम अनधिकृत बांधकामे सुरू आहेत.