शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणाला तांत्रिक बिघाडामुळे विलंब! पुणे - दिल्ली विमानाला तब्बल ५ तास उशीर; कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 20:40 IST

एअर इंडियाकडून विमानाच्या उड्डाणाला तांत्रिक कारणामुळे उशीर झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढत आहेत

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मंगळवारी सकाळी दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. सकाळी साडेसातच्या सुमारास उड्डाण अपेक्षित असलेल्या विमानाने तब्बल पाच तास उशिराने दुपारी साडेबारा वाजता उड्डाण केले. तांत्रिक बिघाडामुळे विमानाला विलंब झाला असला तरी दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

एअर इंडियाचे (एआय २४७०) हे विमान पुणे-दिल्ली दरम्यान सकाळी ७.४० वाजता उड्डाण करणार होते. त्यासाठी प्रवासी नेहमीप्रमाणे दोन ते अडीच तास आधीच विमानतळावर दाखल झाले होते. सर्व सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना वेळेत विमानात बसविण्यात आले. मात्र, नियोजित वेळ उलटूनही विमानाने उड्डाण न केल्याने प्रवाशांमध्ये अस्वस्थता पसरली. सुमारे एक तास प्रवाशांना विमानातच बसवून ठेवण्यात आले. उड्डाणास होणाऱ्या विलंबाबाबत कोणतीही ठोस माहिती न मिळाल्याने प्रवाशांनी वारंवार चौकशी सुरू केली. अखेर विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विमानात येऊन तांत्रिक कारणांमुळे उड्डाणाला विलंब होत असल्याचे सांगत प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, एअर इंडियाकडून विमानाच्या उड्डाणाला तांत्रिक कारणामुळे उशीर झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढत आहेत.

दुपारी साडेबाराला उड्डाण

ज्या प्रवाशांच्या दिल्लीहून पुढील कनेक्टिंग फ्लाइट्स होत्या, त्यांना पर्यायी विमानांचा पर्याय देण्यात आला. मात्र, थेट दिल्लीला जाणाऱ्या बहुतांश प्रवाशांना विमानतळावरच ताटकळत थांबावे लागले. यामध्ये सरकारी अधिकारी, व्यावसायिक, नोकरदार तसेच काही वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा समावेश होता. अखेर दुपारी साडेबारा वाजता विमानाने पुण्याहून उड्डाण केले. हे विमान दिल्ली येथे दुपारी २.४० वाजता पोहोचले. नियोजित वेळेपेक्षा सुमारे पाच तास उशीर झाल्याने अनेक प्रवाशांची कामे खोळंबली. काही प्रवाशांनी विमान कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune-Delhi Flight Delayed 5 Hours Due to Technical Issues

Web Summary : An Air India Pune-Delhi flight was delayed by five hours due to technical difficulties, inconveniencing passengers. Passengers were kept waiting, causing missed connections and disrupted schedules. Some expressed dissatisfaction with the airline's management.
टॅग्स :pune airportपुणे विमानतळdelhiदिल्लीairplaneविमानAirportविमानतळpassengerप्रवासीAir Indiaएअर इंडिया