फ्लॅट विक्री नोंदणी बिल्डरांच्या कार्यालयातच, लवकरच करणार सक्ती; नागरिकांच्या सोयीसाठी राज्य सरकारचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 08:51 AM2021-11-28T08:51:50+5:302021-11-28T08:53:23+5:30

- दीपक मुनोत पुणे : बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या मालकीच्या सदनिका विक्री नोंदणी प्रक्रिया (रजिस्ट्रेशन)  त्यांच्या कार्यालयात पूर्ण करावी, अशी ...

Flat sale registration in builder's office, soon to be forced; State Government's proposal for the convenience of citizens | फ्लॅट विक्री नोंदणी बिल्डरांच्या कार्यालयातच, लवकरच करणार सक्ती; नागरिकांच्या सोयीसाठी राज्य सरकारचा प्रस्ताव

फ्लॅट विक्री नोंदणी बिल्डरांच्या कार्यालयातच, लवकरच करणार सक्ती; नागरिकांच्या सोयीसाठी राज्य सरकारचा प्रस्ताव

Next

- दीपक मुनोत

पुणे : बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या मालकीच्या सदनिका विक्री नोंदणी प्रक्रिया (रजिस्ट्रेशन)  त्यांच्या कार्यालयात पूर्ण करावी, अशी सक्ती आगामी दोन-तीन महिन्यांत करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी नोंदणी महानिरीक्षकांसह सर्व संबंधितांना दिले आहेत. ई- रजिस्ट्रेशन अंतर्गत, ʻरेराʼ मान्य आणि प्रथम विक्री व्यवहारासाठी (फर्स्ट सेल) हा निर्णय लागू असेल.

राज्यातील बहुतांश नोंदणी उपनिबंधकांच्या कार्यालयांची दुरवस्था झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, या उद्देशाने सोयीसुविधांचा अभाव असलेल्या नोंदणी उपनिबंधकांच्या कार्यालयातच नागरिकांना यावे लागू नये, या उद्देशाने बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातच  ई-नोंदणी प्रक्रिया पार पडावी, असा प्रयत्न विभागाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. करीर यांनी वरील निर्देश दिले आहेत. या प्रक्रियेत, बिल्डरच्या कागदपत्रांना तसेच व्हॅल्युएशनला   विभागाचे  सहनिबंधक हे मंजुरी देतील. त्यानंतर नॅशनल इन्फोरमॅटिक्स सेंटर (एनआयसी) यांनी विकसित केलेल्या प्रणालीद्वारे डेव्हलपरच्या कार्यालयात अथवा अन्यत्र रजिस्ट्रेशन प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यासाठी विभागातर्फे ई - रजिस्ट्रारची नियुक्ती केली जाईल. अधिकारी बिल्डरच्या कार्यालयात रजिस्ट्रेशन प्रक्रिया पार पाडतील. बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई व तत्सम संघटनांबरोबर संपर्क साधून रजिस्ट्रेशनच्या प्रस्तावाबाबत माहिती द्यावी, असेही सुचवण्यात आले आहे.

या प्रक्रियेत काही अडचणी  येत आहेत. प्रथम त्या  दूर करण्यावर आमचा भर आहे. नागरिकांना कार्यालयात न येता सोयीनुसार रजिस्ट्रेशन करता यावे, असा उद्देश आहे.
- डॉ. नितीन करीर, 
अतिरिक्त मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य.

Web Title: Flat sale registration in builder's office, soon to be forced; State Government's proposal for the convenience of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app