Pune: फुरसुंगी गावच्या उरुसात तरुणाचा खून करणारे पाच जण अखेर अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 11:48 IST2023-06-20T11:47:14+5:302023-06-20T11:48:08+5:30

टेंभूर्णी, कुर्डुवाडी, माढा, वैराग या भागांतील ३०० हून अधिक सीसीटीव्ही तपासातून आरोपीचा माग काढण्यात आला...

Five persons who killed a youth in Urus of Fursungi village are finally arrested | Pune: फुरसुंगी गावच्या उरुसात तरुणाचा खून करणारे पाच जण अखेर अटकेत

Pune: फुरसुंगी गावच्या उरुसात तरुणाचा खून करणारे पाच जण अखेर अटकेत

पुणे : फुरसुंगी गावच्या उरुसात झालेल्या वादातून तरुणाचा खून करून पसार झालेल्या आरोपींना हडपसर पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील वैराग परिसरातून पकडले. टेंभूर्णी, कुर्डुवाडी, माढा, वैराग या भागांतील ३०० हून अधिक सीसीटीव्ही तपासातून आरोपीचा माग काढण्यात आला.

प्रतीक पोपट कामठे (वय २४, रा. फुरसुंगी), शुभम सुधाकर गायकवाड (वय २१), आशुतोष ऊर्फ सोन्या शरद पोटे (वय २१), स्वराज सुनील दोरगे (वय १९), अनिकेत ज्ञानेश्वर कटके (वय १९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वैभव विठ्ठल गायकवाड (वय २३) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपींचा फुरसुंगी गावातील उरुसात गायकवाडशी वाद झाला होता. १६ जून रोजी आरोपींनी मध्यरात्री दुचाकीवरून निघालेल्या गायकवाडला अडवून त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. या घटनेत गायकवाड याचा मृत्यू झाला होता.

हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने स्थानिक नागरिक, पोलिस पाटील यांच्या मदतीने माहिती काढल्यावर पळून गेलेले आरोपी वैरागहून पुण्याकडे येत असताना पोलिसांच्या पथकाने त्यांना दौंड परिसरात सापळा लावून पकडले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे निरीक्षक विश्वास डगळे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, प्रशांत टाेणपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

Web Title: Five persons who killed a youth in Urus of Fursungi village are finally arrested