खुनी हल्ल्याप्रकरणी पाच जणांना कोठडी

By Admin | Updated: June 26, 2017 04:02 IST2017-06-26T04:02:36+5:302017-06-26T04:02:36+5:30

सणासाठी वर्गणी दिली नाही म्हणून एकावर तलवारीने वार केल्याप्रकरणी ५ जणांची २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने रविवारी दिले.

Five people were killed in a murderous assault case | खुनी हल्ल्याप्रकरणी पाच जणांना कोठडी

खुनी हल्ल्याप्रकरणी पाच जणांना कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सणासाठी वर्गणी दिली नाही म्हणून एकावर तलवारीने वार केल्याप्रकरणी ५ जणांची २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने रविवारी दिले.
इब्राहीम इस्माईल शेख (वय ३१, श्रावस्ती कॉलनी), मन्सूर महंमद हानिफ सय्यद (वय ३५), ताज इस्माईल शेख (वय २५), रमजान इस्माईल शेख (वय २६) आणि चिकू ऊर्फ सिकंदर अख्तर शेख (वय १८, सर्व रा. दोपोडी) अशी कोठडी देण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. जमिल खान आणि जुबेदा शेख यांना २४ तारखेला अटक करण्यात आली असून २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. याप्रकरणी नूर रशीद बदनकारी (वय २८, रा. न्यू गुलाबनगर, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या दरम्यान दापोडी येथे झाली.

Web Title: Five people were killed in a murderous assault case