शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

संत सोपानदेव मंदिरात 'विठू नामाचा गजर अन् राम कृष्ण हरीच्या जयघोषात' मेंढ्यांचे पहिले प्रतिकात्मक रिंगण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 17:56 IST

दरवर्षी पालखी प्रस्थान झाल्यावर सहाव्या दिवशी बारामती तालुक्यातील पिंपळी- लिमटेक येथे मेंढ्यांचे रिंगण घेण्यात येते

ठळक मुद्दे वारीतील विविध उपक्रमांची परंपरा खंडित होवू नये यासाठी मंदिरातच प्रतीकात्मक स्वरुपात मेंढ्यांचे रिंगण

सासवड: क्षेत्र पंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त संतांच्या पालख्यांचा पायी वारी सोहळ्याचे दिवस सुरु आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी रद्द झाली तरी नित्य कार्यक्रम मंदिरातच प्रतीकात्मक स्वरुपात सुरु आहेत. त्याच अनुषंगाने डोक्यावर तुळशी वृंदावन घेवून, टाळ - मृदुंगाचा गजर आणि राम कृष्ण हरी चा जयघोष करीत बारामती तालुक्यातील पिंपळी- लिमटेक येथील विसाव्याच्या ठिकाणचे मेंढ्यांचे पहिले रिंगण मंदिरात पार पडले. यावेळी उपस्थित भाविक भान हरपून विठू नामाचा गजर करीत होते. टाळ्यांचा कडकडाट, ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करीत स्वागत करण्यात आले. 

सासवड येथून संत सोपानदेव महाराज पालखी प्रस्थान प्रतीकात्मक स्वरुपात पार पडल्यानंतर परंपरेनुसार आज पायी वारीचा सहावा दिवस आहे. आणि दुपारचा विसावा बारामती तालुक्यातील पिंपळी- लिमटेक येथे असतो. त्यामुळे वारी बंद असली तरी वारीतील विविध उपक्रमांची परंपरा खंडित होवू नये यासाठी मंदिरातच प्रतीकात्मक स्वरुपात मेंढ्यांचे रिंगण घेण्यात आले.

मंदिरात पहाटे काकडा आरती, महापूजा आणि सकाळी संगीत भजन पार पडल्यानंतर मंदिरात पंचपदी करून संतांचा अभंग घेण्यात आला. त्यानंतर डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगवी पताका आणि गळ्यात टाळ मृदुंग घेवून हरिनामाचा गजर करीत मंदिर प्रदक्षिणा घेण्यात आली. तसेच हरिनामाच्या जयघोषात मेंढ्यानी संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून रिंगण पूर्ण केले. यावेळी भाविकांनी ज्ञानोबा तुकाराम चा जयघोष करीत हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर