College Open: पुण्यात पहिल्याच दिवशी अभाविपचं स.प. महाविद्यालयात आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 12:21 PM2021-10-12T12:21:39+5:302021-10-12T16:54:49+5:30

महाविद्यालयाने फी मध्ये सवलत द्यावी या मागणीसाठी घोषणाबाजी आणि झेंडे घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले आहे.

on the first day in pune akhil bhartiy vidyarthi parishad Movement in sp college | College Open: पुण्यात पहिल्याच दिवशी अभाविपचं स.प. महाविद्यालयात आंदोलन

College Open: पुण्यात पहिल्याच दिवशी अभाविपचं स.प. महाविद्यालयात आंदोलन

Next
ठळक मुद्देमहाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची लूट सुरु

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षांनी महाविद्यालये सुरु झाली आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश करण्यासाठी दोन डोस बंधनकारक असल्याचा नियम लागू करण्यात आला आहे. पुण्यात स.प. महाविद्यालयाबाहेर आज पहिल्याच दिवशी (akhil bharatiya vidyarthi parishad) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे. महाविद्यालयाने फी मध्ये सवलत द्यावी या मागणीसाठी घोषणाबाजी आणि झेंडे घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले आहे. 

''अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्यात यावी. यासाठी आंदोलन करत आहोत. सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता पुण्यात मराठवाडा, विदर्भ, इतर जिल्ह्यातून असंख्य विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. पुण्याकडे विद्येचे माहेरघर म्ह्णूनच पहिले जाते. या माहेरघरात मध्यवर्ती भागात असणाऱ्या स. प.महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना अशी वागणूक मिळते. हे योग्य नाही असे विद्यार्थांनी यावेळी सांगितले आहे.'' 

''महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत द्यावी. तसेच हप्त्याने भरण्याची परवानगी द्यावी. या मागण्यांसाठी आम्ही प्राचार्य यांच्याकडे गेलो होतो. पण ते सांगतात हे आमच्या हातात नाही. मग तुम्ही या खुर्चीवर कशाला बसले आहात? असा प्रश्नही विदयार्थ्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची लूट सुरु आहे.  आमच्या मागण्या पूर्ण झाल्याचं पाहिजेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.''

Web Title: on the first day in pune akhil bhartiy vidyarthi parishad Movement in sp college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app