कोंढव्यात किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार; दोन जणांविरोधात गुन्हे दाखल

By नितीश गोवंडे | Updated: December 22, 2024 18:23 IST2024-12-22T18:23:33+5:302024-12-22T18:23:58+5:30

आरोपीने किरकोळ कारणावरून दहशत करत तलवार व पेव्हर ब्लॉकने गाड्या फोडल्या आणि हवेत गोळीबार केला

Firing in the air over minor reason in Kondhwa Cases registered against two people | कोंढव्यात किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार; दोन जणांविरोधात गुन्हे दाखल

कोंढव्यात किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार; दोन जणांविरोधात गुन्हे दाखल

पुणे: उभे राहण्याबाबत टोकल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून एकाने दहशत माजवण्यासाठी हवेत गोळीबार केला. हा प्रकार शनिवारी (दि. २१) रात्री पावणेबाराच्या सुमारास कोंढव्यातील करिमस कॅफे येथे घडला. याप्रकरणी दोन जणांविरोधात कोंढवापोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कौसर बार येथील करिमस कॅफे येथे ताहा शेख, नोमान पठाण, अब्दुला व अन्य एक मित्र असे चौघे जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अब्दुला याची मैत्रीण त्या ठिकाणी आली. अब्दुला व त्याची मैत्रिण थोड्या अंतरावर रोडवर उभे राहून बोलत असताना, तेथे तीन जण आले. त्यांनी दोघांना त्याठिकाणी उभे न राहण्याबाबत टोकले. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्याचा राग मनात ठेऊन तैमुरअली पठाण (रा. गल्ली नंबर १४, सय्यदनगर, मोहंमदवाडी) याने परिसरातील मुले बोलवून घेत परिसरात दहशत करण्यासाठी तलवार व पेव्हर ब्लॉकने हॉटेलसमोरील गाड्या फोडल्या. यावेळी अब्दुला ऊर्फ बकलब कुरेशी याने त्याच्याजवळील पिस्टल काढत हवेत फायरिंग केले. या घटनेत कुणीही जखमी झाले नसून, पोलिसांना घटनास्थळी रिकामी पुंगळी (शेल) देखील मिळाले आहे. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, फायरिंग अब्दुला ऊर्फ बकलब कुरेशी (रा. सय्यदनगर, मोहंमदवाडी) याने केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

Web Title: Firing in the air over minor reason in Kondhwa Cases registered against two people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.