शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

इस्टेट एजंटवर धायरीत गोळीबार

By admin | Updated: May 26, 2015 01:16 IST

पत्नीसह पान टपरीवर पान खाण्यासाठी आलेल्या इस्टेट एजंटवर भररस्त्यात प्राणघातक हल्ला करण्यात आला.

पुणे : पत्नीसह पान टपरीवर पान खाण्यासाठी आलेल्या इस्टेट एजंटवर भररस्त्यात प्राणघातक हल्ला करण्यात आला. जीव वाचवण्यासाठी एका हॉटेलमध्ये लपलेल्या या इस्टेट एजंटवर हॉटेलमध्ये घुसून सपासप वार करीत गोळीबारही करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास धायरीमध्ये घडली. गेल्या काही दिवसांत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट बनला आहे.हसन अब्दुल जमीर शेख (वय ३२, रा. रायकरनगर, धायरी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी रेश्मा (वय ३०, रा. धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. शेख यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर पूर्वीचे काही गुन्हेही दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख आणि त्यांची पत्नी रविवारी रात्री पान खाण्यासाठी मोटारीमधून वडगाव धायरी येथील मुक्ताई गार्डनजवळील पानटपरीवर आले होते. त्यांची पत्नी गाडीमध्ये बसलेली होती; तर शेख पान घेण्यासाठी खाली उतरले होते. पान घेऊन मोटारीच्या मागील बाजूस मित्रांसोबत गप्पा मारत उभे असतानाच सहा तरुण धारदार हत्यारे घेऊन तेथे आले. त्यांनी शेख यांच्यावर हल्ला चढवला. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी शेख जवळच असलेल्या हॉटेलमध्ये पळाले. हॉटेलच्या किचनमध्ये पळालेले शेख किचनला दुसरा रस्ता नसल्यामुळे अडकून पडले. त्यांच्या पाठोपाठ आलेल्या हल्लेखोरांनी शेख यांच्यावर धारदार हत्यारांनी हल्ला चढवला. त्यांच्यावर सपासप वार करून गोळीबार करण्यात आला.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शेख यांना एरंडवण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच रात्र गस्तीवर असलेले उपायुक्त पी. आर. पाटील, उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. हा हल्ला जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारामधील वर्चस्वाच्या वादामधून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (प्रतिनिधी)२ गोळ्या झाडल्या४ शेख यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या असून, यातील एका गोळीची पुंगळी पोलिसांना किचनमध्ये मिळून आली. दरम्यान, हॉटेलमधील आचारीही या हल्ल्यामध्ये जखमी झाला आहे.