शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

‘एसी डॅक्ट’मुळे आग भडकल्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:11 IST

पुणे : सिरम इन्स्टिट्युटमध्ये निर्माणाधीन असलेल्या इमारतीत एकाच वेळी २ ते ३ कंपन्यांची वेगवेगळी कामे सुरु होती. त्यात ‘एसी ...

पुणे : सिरम इन्स्टिट्युटमध्ये निर्माणाधीन असलेल्या इमारतीत एकाच वेळी २ ते ३ कंपन्यांची वेगवेगळी कामे सुरु होती. त्यात ‘एसी डक्ट’चेही काम केले जात होते. त्यातूनच आग पसरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत दोन्ही मजल्यावरील केबीन, पाटिर्शन, वायरी, दरवाजाचे कुशन असे सर्व साहित्य जळून खाक झाले.

वेळेत पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या हडपसर येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी इमारतीमधील सहा जणांना सुखरुप बाहेर काढले. त्यामुळे जीवीतहानीचे प्रमाण कमी झाले.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आगीचे वृत्त समजताच हडपसर व कोंढवा येथील गाड्या सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचल्या. तोपर्यंत आग सर्वत्र पसरु लागली होती. या इमारतीतील दालनात पार्टिशन तयार करणे, दरवाजांना कुशन लावणे, केबीन तयार करणे अशी कामे वेगवेगळ्या २ ते ३ कंपन्यांमार्फत केली जात होती. छताचे पीओपी करण्याचे कामही सुरु होते. तसेच एसी डक्टचे काम सुरु होते. हे एसी डक्ट सर्व मजल्यावर फिरवले जाते. त्यात नेमकी पहिली आग कोठे लागली. ते अद्याप समोर आलेले नाही.

आग लागल्याने फर्निचरच्या साहित्याने पटकन पेट घेतला. दरवाजांना कुशन लावले असल्याने तीही पेटली. धुर बाहेर जाण्यास जागा नसल्याने आग आतमध्येच धुमसत राहिली. एसी डक्टमुळे ही आग चौथ्या व पाचव्या मजल्यावर वेगाने पसरली.

अग्निशमन दलाने खिडक्यांची तावदाने फोडून धुराला बाहेर वाट करुन दिल्यानंतर आग विझविण्यास सुरुवात झाली. सुमारे २ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मि‌‌ळाले. आग विझविल्यानंतर आतमध्ये जाऊन पाहणी केल्यानंतर वरच्या मजल्यावर ५ जणांचे मृतदेह आढळले. ते पूर्णपणे भाजले होते. धुरामुळे कोणालाही काही दिसत नव्हते. हे कामगार त्याच मजल्यावर काम करीत असल्याने त्यांना बाहेर जाण्याचा दरवाजा दिसला नसावा. धुरामुळे गुदमरुन त्यांचा आतच मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज आहे.

चौकट

आंतरराष्ट्रीय संस्थेत दुर्लक्ष?

एखाद्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर आगीपासून सरंक्षण करणारी यंत्रणा सक्रीय केली जाते. मात्र, इमारतीत काम सुरु असताना काम करणारे कामगार कसे काम करतात, अशा संभाव्य दुर्घटना उद्भवल्यास काय काळजी घ्यावी, याची कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. मात्र ‘सिरम’सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीतही अशी घटना घडावी, या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशा दुर्घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळे निर्माणधीन महत्वाच्या प्रकल्पातील सुरक्षा उपायांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.