बाणेर येथील पॅनकार्ड क्लब इमारतीला आग ; इमारतीचे माेठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 14:20 IST2020-01-06T14:19:54+5:302020-01-06T14:20:21+5:30

पुण्यातील बाणेर भागातील पॅनकार्ड क्लब इमारतीला आग. आगीत इमारतीचे माेठ्याप्रमाणावर नुकसान.

Fire at Pancard Club building in Baner; Damage to the building | बाणेर येथील पॅनकार्ड क्लब इमारतीला आग ; इमारतीचे माेठे नुकसान

बाणेर येथील पॅनकार्ड क्लब इमारतीला आग ; इमारतीचे माेठे नुकसान

पुणे : पुण्यातील बाणेर भागातील पॅनकार्ड क्लब या इमारतीला आज दुपारी 12.15 च्या सुमारास आग लागली. या आगीत या इमारतीचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने कुठलिही जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या पाच फायर इंजिनच्या सहाय्याने आग आटाेक्यात आणण्यात यश आले आहे. या आगीत इमारतीचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. 

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 12.15 च्या सुमारास बाणेर येथील पॅनकार्ड क्लब या इमारतीला आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करत आग विझविण्याचे प्रयत्न केले. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान सध्या कुलींग ऑपरेशन करण्यात येत आहे. 

पॅनकार्ड क्लब या इमारतीमध्ये रेस्टाॅरंट असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या इमारतीचा वाद काेर्टात सुरु असल्याने इमारत बंद हाेती. इमारतीच्या घुमटाकार भागाला आग लागली हाेती. 

Web Title: Fire at Pancard Club building in Baner; Damage to the building