शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

मोडेप्रो कंपनीत आग : कुरकुंभची औद्योगिक सुरक्षा अधांतरीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 00:21 IST

कुरकुंभ : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पांत अपघाताच्या घटनांची मालिका सुरूच असून, परिसरातील कामगार व स्थानिक रहिवाशांची सुरक्षा आजही ...

कुरकुंभ : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पांत अपघाताच्या घटनांची मालिका सुरूच असून, परिसरातील कामगार व स्थानिक रहिवाशांची सुरक्षा आजही धोक्यातच असल्याचे वास्तव चित्र वारंवार घडणाऱ्या छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटनेतून अधोरेखित होत आहे.प्रकल्प उभा करताना दिल्या जात असणाºया विविध परवानग्या या आर्थिक संबंधांतून निकष न तपासताच दिल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत असून, त्याबाबत इतक्या वर्षांपासून एकाही शासकीय अधिकाºयाने आपली भूमिका स्पष्ट मांडलेली दिसत नाही. एरवी एखाद्या मंत्र्याच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे अधिकारी अपघाताच्या वेळेस कुठे गायब असतात, याबाबत आजही प्रश्नचिन्ह आहे.शुक्रवारी (दि. २८) सकाळी कुरकुंभ येथील मोडेप्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग जरी थोड्या प्रमाणात असली, तरी कंपनीकडे असणारी सुरक्षा यंत्रणामात्र त्या आगीला नियंत्रित करणारीदेखील नसल्याचे दिसत आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन आग विझवली. यामध्ये कोणालाही इजा झाली नाही; मात्र याघटनेतून असुरक्षितता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मालकांकडे कंपनी उभी करण्यासाठी करोडो रुपये असतात. अनेकविध परवानग्या मिळविण्यासाठी खर्चदेखील भरमसाट केला जातो; मात्र सुरक्षेच्या बाबतीत उदासीनता का असते, हा प्रश्न येथील सर्वसामान्य कामगारांना नेहमीच पडत आहे.दरम्यान, या औद्योगिक क्षेत्रात होणाºया अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून अनेक बैठकादेखील झाल्या आहेत. यामध्ये औद्योगिक क्षेत्राशी निगडितशासनाच्या विविध अधिकाºयांनी हजेरीदेखील लावलेली आहे. सुरक्षेच्या बाबतीत अनेकांना निर्देशदेखील देण्यात आले आहेत. मात्र, बैठका संपल्यावर परिस्थिती ‘जैसे थे’ होत असून दिलेल्या निर्देशांना केराची टोपली दाखवून कंपनी मालक व व्यवस्थापन वेळकाढूपणा करीत आहे.त्यामुळे अधिकारी व व्यवस्थापन यांच्यामधील संबंध लपलेले नाहीत; परंतु या सर्वांच्या मध्ये येथील ग्रामस्थ व कामगार नेहमीच दुर्लक्षित होत आहे. रासायनिक प्रकल्प असूनदेखील अनेक कंपन्यांकडे स्वत:चे सुरक्षा अधिकारी नाहीत. परिणामी, प्रत्यक्षात काम करणाºया कामगारांना सुरक्षेबाबत काहीच माहिती नसते. थोड्याफार प्रमाणात असणाºया सुरक्षा उपकरणांना हाताळण्याची माहितीदेखील बºयाच अंशी कोणाला नसते. त्यामुळे घटना छोटी जरी असली, तरी कामगार भयभीत होतात. मात्र, याबाबत पुढाकाराने कोणीच लक्ष देत नाही.औद्योगिक क्षेत्रासाठी नेमलेले शासकीय सुरक्षा अधिकारी नाममात्र अपघातानंतर येऊन जागेची पाहणी करून जातात. यापलीकडे दुसरे काहीच होत नसल्याचे आजवरच्या घटनांतून समोर येते.बहुतांशी कंपन्यांकडे जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिकादेखील नसते. त्यामुळे सर्व कारभार रामभरोसे असल्याचे निदर्शनास येते. मात्र, या छोट्या घटनेतूनच धडा घेऊन भविष्यातील मोठ्या दुर्घटना टाळणे सर्वांसाठी भल्याचे होईल, याची जाणीव वेळीच जबाबदार यंत्रणांनी घेणे आवश्यक आहे; अन्यथा मोठा अनर्थ घडण्यास वेळ लागणार नाही.

टॅग्स :Puneपुणे