शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात घरगुती सिलेंडरच्या वायु गळतीने आग; एक महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 14:01 IST

नवरात्रीमुळे देवघरात असणाऱ्या समईतील दिवा रात्रभर सुरू असल्याने पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली...

धायरी (पुणे) : गॅस सिलेंडरच्या वायु गळतीने घरामध्ये आग लागल्याने एक महिला जखमी झाली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास नऱ्हे परिसरात घडली. चैञाली ईश्वर मांढरे (वय: २९ वर्षे, रा. सोनाई निवास, भैरवनाथ मंदिराजवळ, नऱ्हे,पुणे) असे आगीत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. 

सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागातील भैरवनाथ मंदिराजवळ असणाऱ्या सोनाई निवास या चार मजली इमारतीमध्ये मांढरे कुटुंबीय राहतात. सर्व कुटुंबीय रात्री जेवण करून घरात झोपले होते. त्यानंतर  घरात असणाऱ्या गॅस सिलेंडरची वायु गळती झाली. मात्र नवरात्रीमुळे देवघरात असणाऱ्या समईतील दिवा रात्रभर सुरू असल्याने पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली.

पहिल्या मजल्यावर असलेल्या घरामध्ये सोप्यावर झोपलेल्या चैत्राली मांढरे यांना आगीचे चटके बसले असून त्यात त्यांच्या हाताला भाजले असून त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. तर त्यांची सासू व सासरे हे तळमजल्यात असणाऱ्या खोलीत झोपले असल्याने ते बचावले आहेत.

घटनेची माहिती मिळताच सनसिटी अग्निशमन दलाचे जवानानी घटनास्थळी पोहोचताच घरामधील वायुगळती असणारा सिलेंडर प्रथमतः बाहेर काढत जवानांनी पाण्याचा मारा करत गृहपयोगी वस्तुंना लागलेली आग इतरत्र पसरु न देता पूर्ण विझवत पुढील धोका टाळला. या घटनेत घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. यावेळी जवानांनी घरातील मोकळे इतर दोन सिलेंडर बाहेर काढले व सुरक्षेच्या कारणास्तव वायुगळती होत असलेला सिलेंडर स्वतच्या ताब्यात घेतला.

सिंहगड अग्निशमन केंद्र अधिकारी प्रभाकर उम्राटकर, तांडेल पांडुरंग तांबे, वाहन चालक संतोष चौरे व फायरमन नितीन मोकाशी, सतीश डाकवे, संजू चव्हाण तसेच मदतनीस कोकरे, जाधव आदी जवानांनी आग आटोक्यात आणली.  

नवरात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली धाव...मांढरे कुटुंबियांच्या घराजवळच अखिल नऱ्हेगाव मित्रमंडळ नावाचे सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ आहे. जखमी झालेल्या चैत्राली मांढरे यांचे पती ईश्वर मांढरे हे या सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळात असणाऱ्या मंडपात झोपले होते. आग लागल्याचे समजताच त्यांच्यासह मंडळाचा कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच आगीत जखमी झालेल्या चैत्राली मांढरे यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

टॅग्स :PuneपुणेFire Brigadeअग्निशमन दलfire brigade puneपुणे अग्निशामक दल