शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नऱ्हेत शॉर्टसर्किटमुळे आग; 3 घरे भस्मसात

By admin | Updated: August 31, 2015 03:51 IST

भाटघर धरणाच्या काठावर असलेल्या नऱ्हे गावात शॉर्टसर्किटमुळे आग लागून तीन घरे जळाली. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. आगीत घरातील धान्य,

भोर : भाटघर धरणाच्या काठावर असलेल्या नऱ्हे गावात शॉर्टसर्किटमुळे आग लागून तीन घरे जळाली. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. आगीत घरातील धान्य, कपडे, किमती वस्तू तसेच रोख रक्कम असे एकूण १५ ते २० लाखांचे नुक सान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. नऱ्हे गावातील अंकुश लक्ष्मण वीर, नामदेव गणपती वीर व कुंडलिक धोंडिबा वीर या तिघा जणांची एकमेकांना लागून घरे आहेत. शनिवारी रात्री २ वाजता वीज गेली होती. ती पुन्हा परत आल्यावर शॉर्टसर्किट होऊन घराच्या माळ्यावरील गोवऱ्या जळाल्याने आग लागली. धुरामुळे घरातील लहान मुलाला व लहू वीर यांना जाग आली. त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. तातडीने घरामधील तसेच आजूबाजूच्या घरातील लोकांना बाहेर काढत त्यांनी गावकऱ्यांना आग विझवण्यासाठी मदत मागितली. मात्र, आग मोठी असल्याने घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे आगीची तीव्रता आणखी वाढली. यामुळे आग विझवण्यात अडचणी येत होत्या. सासवड व पुणे येथून दोन आगीचे बंब पहाटे साडेचार वाजता आले. तोपर्यंत चार खोल्या जळून खाक झाल्या होत्या. या घटनेत नामदेव वीर यांच्या घरात शेतीची कागदपत्रे, सोन्याचे गंठण, १० हजार रोख, ३ पोती गहू, २ पोती तांदूळ, ५ पोती शेंगा, पाण्याची मोटार, ४० साड्या व कपडे, किमती वस्तू असे ७ लाखांचे नुकसान झाले. अंकुश वीर व कुंडलिक वीर यांचे १० पोती तांदूळ, दोन पोती गहू, ४ खाटा, बॅरल, भांडी, कपडे, ५ हजार रोख, किमती वस्तू जळून सुमारे १२ लाखांचे नुकसान झाले. तिघांचे मिळून एकूण १५ ते २० लाखांचे नुक सान झाले आहे. सर्व संसारोपयोगी वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने नुकसानभरपाईची मागणी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांनी केली आहे. दरम्यान, नायब तहसीलदार धनंजय जाधव यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. महिला बालकल्याण सभापती वंदना धुमाळ, माजी उपसभाती अमोल पांगारे यांनी गावात येऊन कुटुंबांची भेट घेऊन घराची पाहणी केली. (वार्ताहर)