शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

येवलेवाडीत सोफा कारखान्याला आग, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 13:44 IST

सोफा बनविण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात दोन गॅस सिलिंडर आणून ठेवलेले होते.

कोंढवा : येवलेवाडी येथील सोफा बनविण्याच्या कारखान्याला आग लागून एक कामगार गंभीर भाजला गेला. उपचासाराठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. हरुण हमद खान, (वय ४५, रा. येवलेवाडी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोंढवा- येवलेवाडी रस्त्याच्या नजीक येवलेवाडी येथे शगीर पाशा असे दुकानमालकांचे नाव आहे. त्यांनी हा गाळा भाडेतत्त्वावर दिला होता. त्यामध्ये सोफ्याचा कारखाना सुरू करण्यात आला होता.

सोफा बनविण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात दोन गॅस सिलिंडर आणून ठेवलेले होते. सिलिंडर या ठिकाणी का आणले होते त्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. त्या सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे कारखान्याला आग लागल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली असली तरी कारखान्यातील कामगारांनी त्याला दुजोरा दिला नाही. तर कारखान्यात वेल्डिंगचे काम सुरू असल्याने त्याच्या ठिणग्या उडून आग लागली असल्याची माहिती काही जणांनी दिली. मात्र, आगीचे कारण निश्चित पुढे आलेले नाही.आग लागली त्यावेळी पाच कामगार कारखान्यात होते. त्यांनी धावत पळत जीव बाहेर पडून आपला जीव वाचविला, मात्र, पाचवा कामगार आत अडकला आणि आगीमध्ये तो गंभीर भाजला गेला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द येथील अग्निशामक दलाच्या गाड्या व एक वाॅटर टँकर यांनी सुमारे एक तासात आग आटोक्यात आणली.कोंढवा मिठानगर येथे ही ट्रान्स्फॉर्मरला आगकोंढवा, मिठानगर येथे दुपारी दोन वाजता इमारतीच्या आवारातील इलेक्ट्रिक ट्रान्स्फॉर्मरने पेट घेतला होता. आगीचा वेग वाढत चालला होता. सदरील घटनेची माहिती कोंढवा खुर्द येथील अग्निशमन वाहन दलाला प्राप्त होताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर वेळेत नियंत्रण मिळवत पुढील धोका टाळला. अग्निशामक दलाच्या जवानांनी घेतलेल्या काळजीमुळे या घटनेत कोणीही जखमी नाही.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfireआगFire Brigadeअग्निशमन दलfire brigade puneपुणे अग्निशामक दलPoliceपोलिस