सदाशिव पेठेत चव्हाण वाड्याला आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 21:44 IST2025-10-19T21:44:15+5:302025-10-19T21:44:32+5:30
आग नेमकी कशामुळे लागली याचे निश्चित कारण समजू शकले नसून जखमी वा जीवितहानी नाही.

सदाशिव पेठेत चव्हाण वाड्याला आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण
पुणे - आज राञी आठ वाजता १२९१, सदाशिव पेठ, चव्हाण वाडा याठिकाणी आग लागल्याची वर्दि मिळताच अग्निशमन दलाकडून पाच वाहने दाखल होत आग विझवण्याचे काम सुरु करण्यात आले होते.
घटनास्थळी एक मजली वाडा व यामध्ये एकूण चार कुटुंबे राहात होती. सदर ठिकाणी छतावर आग लागल्याचे निदर्शनास येताच कुटुंबातील रहिवाशांनी अग्निशमन दलास पाचारण करीत वाड्याबाहेर धाव घेतली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग व धूर मोठ्या प्रमाणात असल्याने वाड्यात आतमध्ये प्रवेश करून प्रथम कोणी अडकले नाही खाञी करीत तीन सिलेंडर बाहेर घेत आगीवर पाणी मारून सुमारे वीस मिनिटात आग आटोक्यात आणून कुलिंगचे काम सुरु ठेवत आग इतरञ पसरु न देता मोठा धोका टाळला. या आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळाले असून खाली असणाऱ्या दुकानदारांनी त्वरीत मालाचा साठा बाहेर घेतल्याने नुकसान टळले. आग नेमकी कशामुळे लागली याचे निश्चित कारण समजू शकले नसून जखमी वा जीवितहानी नाही.