...अखेर प्रशासन अधिकाऱ्यांची बदली; बारामती नगरपरिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या लढ्यास यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 21:00 IST2021-07-10T21:00:07+5:302021-07-10T21:00:16+5:30

बारामती नगरपरिषद शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी दिंडे यांच्यावर भ्रष्टाचार व नियमबाह्य कामकाज केल्याचा आरोप शिक्षक संघाने केला आहे.

... finally the replacement of administration officers ; Success in the struggle of Baramati Municipal Council Primary Teachers Association | ...अखेर प्रशासन अधिकाऱ्यांची बदली; बारामती नगरपरिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या लढ्यास यश

...अखेर प्रशासन अधिकाऱ्यांची बदली; बारामती नगरपरिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या लढ्यास यश

बारामती : बारामती नगर परिषदेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी पदमावती दिंडे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. ज्या घरात बाप असतो. त्या मुलांची गावात पत असते. आमचा बाप अजितदादा यांच्याकडे संघटनेने दाद मागितली होती. त्यांच्या सूचनेनुसार बारामतीच्या मुख्याधिकारी यांनी तसेच शिक्षण उपसंचालकांनी या प्रकरणी चौकशी केली होती. त्यानंतर त्यांची निरंतर शिक्षण पुणे या ठिकाणी बदली करण्यात आल्याचे शिक्षक संघटनेचे देविदास ढोले यांनी सांगितले.

बारामती नगरपरिषद शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी दिंडे यांच्यावर भ्रष्टाचार व नियमबाह्य कामकाज केल्याचा आरोप करत त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी देखील शिक्षक संघाने नगरपालिका व उपसंचालक कार्यालयाकडे केली होती.याशिवाय महिला शिक्षकांना सतत दडपणाखाली ठेवणे,कोविड नियम डावलुन आजारी शिक्षकांची पिळवणुक करणे आदी तक्रारी शिक्षकांनी दाखल केल्या होत्या. प्रशासन अधिकारी दिंडे आणि शिक्षकांची   गेली दोन महिने संघर्ष चालू होता. आज या संघषार्ला सत्याचा कौल मिळाल्याचे देविदास ढोले यांनी सांगितले.

याप्रकरणी बारामती नगरपरिषद नगराध्यक्षा पौर्णिमा  तावरे ,ज्येष्ठ नगरसेवक किरण दादा गुजर, बारामती शहर राष्ट्रवादी चे अध्यक्ष इम्तियाज शिकलकर,गटनेते सचिन सातव तसेच विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, पुणे जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी खंबीर साथ दिली. त्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा मिळाली. म्हणून बारामती नगरपरिषद प्राथमिक शिक्षक संघ या सर्वांचे तसेच या लढ्यात एक दिलाने संघ शक्तीचे एकजुटीचे दर्शन घडविल्याचे देखील ढोले यांनी नमुद केले.

Web Title: ... finally the replacement of administration officers ; Success in the struggle of Baramati Municipal Council Primary Teachers Association